Petrol Diesel Price: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या (Diesel) वाढत्या किमतींचा वाहतूक क्षेत्रावर होत असल्याने सर्वच वस्तू महागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल वस्तू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्या असल्या तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक नाराज होऊन आपली वाहने सीएनजीमध्ये बदलत आहेत.
भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 ते 11 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, अशा स्थितीत, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे यामागचे मुख्य कारण आहे, ही एक चांगली संधी आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 25-30 डॉलरने कमी झाले होते, त्यामुळे पुढील 2 महिने असेच राहिले तर , तर तेलाच्या किमती कमी होतील. इंधनाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता कधीही होऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असे तपासा यादीत नाव
सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी 22 सप्टेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना सलग १२४ व्या दिवशी दिलासा मिळाला आहे.
म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या ब्रेट क्रूड प्रति बॅरल $91 च्या आसपास आहे.
यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता कधीही होऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असे तपासा यादीत नाव
मुख्य शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
मेष, तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांनी करू नका हे काम; अन्यथा होईल मोठे नुकसान
महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा YouTube वर जलवा! शेतीचे व्हिडिओ बनवून कमवतोय बक्कळ पैसा
Share your comments