1. इतर बातम्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर आज स्वस्त झाले का? जाणून घ्या आजच्या नवीन किंमती...

Petrol-Diesel Price: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
petrol

petrol

Petrol-Diesel Price: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. देशात इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर शंभरी पार गेले आहेत.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (Government Oil Companies) आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. ताज्या दरानुसार आजही देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. प्रमुख मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 120 दिवस स्थिर आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत चढ-उतार होताना दिसत असून आज त्यांच्या किमती वाढताना दिसत आहेत. आजच्या कच्च्या तेलाच्या किमती वरच्या श्रेणीत दिसत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती

कच्च्या तेलाच्या किमती आज वाढत आहेत आणि जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 92.34 वर मिळत आहे. त्याच वेळी, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 85.99 पर्यंत खाली आली आहे.

शेतकऱ्यांची केळीला 18.90 रुपये किलो भाव जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आजची किंमत काय आहे (19 सप्टेंबर 2022 रोजी पेट्रोल डिझेलची किंमत)

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.

हिरोने केली दमदार नवीन स्प्लेंडर लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त मायलेज

अशा प्रकारे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासा-

तुम्हालाही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासायचे असतील तर तुम्ही एसएमएसद्वारे ते पाहू शकता. तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा.

दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. पेट्रोल आणि डिझेलची किंमत तुम्हाला कळेल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शिंदे-फडणवीस सरकारकडून 3 हजार 500 कोटींची नुकसानभरपाई जाहीर
महाराष्ट्रात २४ तासांपासून पावसाचे थैमान! ३ जणांचा मृत्यू; येत्या काही तासांत आणखी धो धो कोसळणार

English Summary: Petrol-Diesel Price: Has petrol diesel price become cheaper today? Published on: 19 September 2022, 09:53 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters