Petrol Diesel Price: देशात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे देशातील दळणवळ महाग झाले आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. तसेच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे.
तसेच आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. तरीही देशात इंधनाचे दर (Fules Rate) कमी होताना दिसत नाहीत. तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे नवे दर अपडेट केले आहेत.
गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या नवीन दरानुसार काही शहरांमध्ये तेलाच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. हे पाहता सरकार देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र सध्या तरी तसे होताना दिसत नाही.
आजही देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकातामध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी 106.03 रुपये आणि डिझेलसाठी 92.76 रुपये मोजावे लागतात. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
शेतकरी पुत्राला सलाम! वडिलांची मेहनत ठरली मुलांसाठी प्रेरणादायी; कमी खर्चात तयार केले कृषी ड्रोन
कोणत्या शहरात किंमत किती आहे
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 103.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
ऊसाच्या या ३ जाती रोग आणि कीड प्रतिरोधक आहेत; भरघोस उत्पादनही देतील
तेलाचे भाव कधी कमी होतील
तुम्हाला सांगतो की, दररोज सकाळी 6 वाजता देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
खरे तर कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करत नाहीत. याचे कारण म्हणजे सवलतीच्या दरात तेल विकल्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोने चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोने 6695 रुपयांनी तर चांदी 25400 रुपयांनी स्वस्त...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा
Share your comments