Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांकडून (Government oil companies) दररोज प्रमाणे आजही पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्या असल्या तरीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार पोहोचले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
आज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर अपडेट केले आहेत. नव्या किमतीनुसार आजही वाहनांच्या इंधनाच्या दरात (Fuels Rates) दिलासा मिळाला आहे, म्हणजेच आजही तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
मुख्य शहरातील दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.72 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
गहू लागवडीअगोदर बियाणे दर्जेदार आहे की नाही, अशाप्रकारे चुटकीसरशी ओळखा
दररोज सकाळी 6 वाजता तेलाचे दर जाहीर होतात
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होत असल्याची माहिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत व्हॅट, डीलर कमिशन, एक्साईज ड्युटी आणि इतर अनेक गोष्टी जोडल्यानंतर किमती जाहीर केल्या जातात.
याप्रमाणे नवीनतम किंमत जाणून घेऊ शकता
तुम्हालाही पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक एसएमएस करावा लागेल. होय, यासाठी तेल कंपन्यांकडून विशेष सुविधा दिल्या जातात. तुम्ही इंडियन ऑइल कंपनी (IOC) चे ग्राहक असल्यास, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवावा लागेल.
महाराष्ट्रात मान्सूनचा धुमाकूळ! ३४३ जणांचा मृत्यू; आजही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
याशिवाय, HPCL ग्राहक 9222201122 वर एसएमएस HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर टाइप करून माहिती मिळवू शकतात.
जर तुम्हाला मुंबईचा इंधन दर जाणून घ्यायचा असेल, तर तुम्हाला RSP स्पेस 108412 (मुंबईचा डीलर कोड) लिहून 92249 92249 वर पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकाल.
महत्वाच्या बातम्या:
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोने 4300 तर चांदी 19000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर...
तुम्ही प्लॅस्टिकचा तर तांदूळ खात नाही ना? असा ओळखा अस्सल आणि नकली बासमती तांदूळ
Share your comments