Petrol-Diesel Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सातत्याने घसरत आहेत. देशात मात्र पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात नागरिकांना कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैरण झाले आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण (Fall in price) सुरूच आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल $ 84.06 सह जानेवारीपासून नीचांकी पातळी गाठली होती. यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $80 च्या खाली आल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पुढच्या आठवड्यापर्यंत ब्रेंट क्रूडच्या किंमतीत घसरण सुरू राहिल्यास नवरात्रीच्या काळात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात SBI मध्ये 747 जागांची भरती तर पूर्ण भारतात 5000 हून अधिक जागा; असा करा अर्ज
आज दिल्ली-मुंबईत पेट्रोलचे दर किती आहेत?
दिल्लीत आज (बुधवार) 28 सप्टेंबर 2022 रोजी पेट्रोलची किंमत 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी मायानगरी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत असताना 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
आनंद अँग्रो केअरच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून कायम आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाच्या बातम्या:
पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! हवामान खात्याचा इशारा
नवरात्रीत सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 10 ग्रॅम सोने 6671 रुपयांनी स्वस्त
Share your comments