1. इतर बातम्या

पेट्रोल डिझेलवर दिलासा कायम! जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...

Petrol Diesel Price Today: देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. आजही भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग ८४ व्या दिवशी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

petrol price today

petrol price today

Petrol Diesel Price Today: देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. आजही भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात सलग ८४ व्या दिवशी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

सुवर्णसंधी! सोने मिळतंय 3700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर...

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

शेतीचा खेळखंडोबा! जूनमध्ये दुष्काळ, जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, शेतकरी उघड्यावर; नुकसान भरपाईची मागणी

मुख्य शहरातील आजचे दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.०३ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर.
नोएडा : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: ९७.१८ रुपये आणि डिझेल ९०.०५ रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
कमी वेळेत मालामाल करणारी शेती! तोंडल्याच्या शेतीची ही खास पद्धत वापरा आणि कमवा बक्कळ पैसा
या जातीच्या टोमॅटोला नाही रोगाचा धोका; लावा आणि कमवा बंपर नफा!

English Summary: petrol diesel Know the latest rates Published on: 13 August 2022, 09:31 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters