1. इतर बातम्या

Pan Card News : भावांनो पॅन कार्ड आहे ना मग ही काळजी घ्या! नाहीतर सरकार करेल 'ही' कारवाई

Pan Card News : पॅन कार्ड (Pan Card) भारतात एक अति आवश्यक कागदपत्र (Document) आहे. या सरकारी डॉक्युमेंटचा वापर सर्व प्रकारच्या सरकारी तसेच गैर सरकारी कामात केला जातो. हे कागदपत्र विशेषता वित्तीय व्यवहारासाठी (Financial) महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आता पॅन कार्ड (Pan Card Update) धारक व्यक्तींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pan card latest update

pan card latest update

Pan Card News : पॅन कार्ड (Pan Card) भारतात एक अति आवश्यक कागदपत्र (Document) आहे. या सरकारी डॉक्युमेंटचा वापर सर्व प्रकारच्या सरकारी तसेच गैर सरकारी कामात केला जातो. हे कागदपत्र विशेषता वित्तीय व्यवहारासाठी (Financial) महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आता पॅन कार्ड (Pan Card Update) धारक व्यक्तींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

आयकर विभागाच्या मते, स्थायी खाते क्रमांक (PAN) हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. मात्र असे असले तरी अनेक लोक अजूनही पॅन कार्डचे महत्व समजून घेत नसल्याचे चित्र आहे.

पॅनशी संबंधित काही महत्त्वाचे विषय आहेत जे प्रत्येक भारतीयाला माहित असले पाहिजेत. या महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी पॅनकार्डच्या संदर्भात एक गोष्ट खूप लक्षात ठेवली जाते.

भारतातील लोकांना फक्त एकच पॅन कार्ड दिले जाते, म्हणजे कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड किंवा डुप्लिकेट पॅन कार्ड (Duplicate Pan Card) ठेवू शकत नाही. तसे केल्यास त्या व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो.

पॅन कार्डमध्ये पॅन क्रमांक आणि कार्डधारकाचे नाव, जन्मतारीख आणि छायाचित्र असते. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार (www.incometaxindia.gov.in) एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन ठेवू शकत नाही.

जर एखाद्या व्यक्तीला पॅन वाटप केले असेल तर तो दुसऱ्या पॅनसाठी अर्ज करू शकत नाही.  अशा परिस्थितीत आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन ठेवल्याबद्दल त्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

या संदर्भात आयकर विभागाचे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅनचे वाटप केले गेले असेल. तर अशावेळी त्याने तातडीने अतिरिक्त पॅनकार्ड सरेंडर करावे. अशा प्रकारे, अशा व्यक्तींना दंड टाळता येऊ शकतो.

English Summary: pan card news big update regarding duplicate pan Published on: 12 September 2022, 01:50 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters