1. इतर बातम्या

हळदीवरील कंद माशीच्या प्रादुर्भावाकडे वेळीच लक्ष द्या...!

सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कंदमाशी

कंदमाशी

कंदमाशी

कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.

या किडीच्या अळ्या उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा गड्डयामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात.

जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो.

. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

व्यवस्थापन:

१. आॅगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.

२.उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.

३. तसेच जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी. तसेच कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.

४. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.

५. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

अशाप्रकारे कंद माशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन भविष्यात होणारे नुकसान टाळावे.

जैविक उपचार

 शे हळद पिकामध्ये आम्ही निंबोळी पावडर दहा किलो टाकत असतो. व प्रकाश सापळे वापरत असतो. राहिलेले बेणे ठेऊ नयेत नष्ट करावी. रस शोषण किडी साठी निंबोळी अर्क मारत असतो.कंदमाशी साठी निंबोळी अर्क फायदेशीर आहे. मुळकुज जी होते त्यासाठी ट्रायकोडर्मा एकरी पाच किलो व निमेटोड साठी पेसिलोमाइसेस नावाची बुरशी वापरत असतो.

जैविक कृषी मार्गदर्शन केंद्र कोलवड ,बुलढाणा

mob.8888128013

 

English Summary: outbreaks appear to be exacerbated during turmeric Published on: 31 August 2021, 06:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters