सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये मोबाईल फोन कंपन्या अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त आणि परवडतील अशा किमतीमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. या स्मार्टफोन लॉन्चमध्ये ओप्पो मोबाईल कंपनी देखील मागे नसून या कंपनीने नुकताच A सिरीज मधील स्मार्टफोन 'ओप्पो A17' लॉन्च केला. या लेखामध्ये आपण या स्मार्टफोन बद्दल माहिती घेऊ.
'ओप्पो A17' स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा फोन दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला असून एक म्हणजे सन लाईट ऑरेंज आणि मिडनाइट ब्लॅक असे दोन पर्याय याच्यामध्ये देण्यात आले आहेत.
हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये एचडी+ रिझोल्युशन सह 6.56 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाईनचा असून यामध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हिलीओ जी 35 चीपसेट आहे.
तसेच उत्तम फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आली असून यामध्ये 50 मेगापिक्सल सेन्सरसह दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. उत्तम सेल्फी फोटोग्राफीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
हा फोन अँड्रॉइड बारा वर आधारित कलर ओएस 12.1.1वर काम करतो.त्याच्यामध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटी साठी ड्युअल सिम,4जी, वाय फाय, ब्लूटुथ 5.3 आणि जीपीएस यासारखे पर्याय देण्यात आले आहे.
या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून चार्ज करण्यासाठी मायक्रो यूएसबी पोर्ट आहे.
किती आहे या फोनची किंमत?
ओप्पो A17 स्मार्टफोनची किंमत 12 हजार 499 रुपये आहे.
Share your comments