देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्याअसलेल्या 44 कोटी खातेदारांसाठी नुकतीच एक महत्वाची माहिती जारी करण्यात आले आहे.एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या बँकिंग विषयी सगळी कामे तातडीने पूर्ण करावी असे सांगितले
.बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा आज 11 डिसेंबर रोजी बंद राहणार आहे तसेच एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवा शनिवारी,रविवारी रात्री साडेअकरा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंतग्राहकांसाठी उपलब्ध नसतील म्हणजेच बंद असणार आहेत.
त्यामुळे स्टेट बँकेच्या ग्राहकांनी11 डिसेंबर च्या मध्यरात्री पूर्वी बँकेचे निगडित ऑनलाईन कामे पूर्ण करावीत असे सांगितले आहे. देशभरात एसबीआय चा मोठं जाळं असून या माध्यमातून ग्राहकांनाबँकिंग शी संबंधित विविध सेवा पुरवल्या जातात. या बँकेच्या ऑनलाईन सुविधांचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे एसबीआय सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी,जनजागृतीपर माहिती ग्राहकांना ट्विटरच्या माध्यमातून देत असते.एसबीआय आता तंत्रज्ञान अपग्रेडेशन करत असल्यानेआज आणि उद्या असे दोन दिवसम्हणजे शनिवार आणि रविवारग्राहकांना ऑनलाइन सेवेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे बँकिंग शी संबंधित कामे तातडीने पूर्ण करावीत.
अशी सूचना एसबीआय अनेक ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. एसबीआयच्या ऑनलाईन बँकिंग सेवांमध्ये आयएनबी,योनोलाईट,योनो बिझनेस आणि यूपीआयया ऑनलाईन सेवांचा समावेश आहे.या सुविधा या कालावधीत बंद राहतील,त्यामुळे ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे बँकेने म्हटले आहे.
Share your comments