जर तुम्हाला कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुमच्या साठी एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.
आम्ही पेट्रोल आणि डिझेल ऑनलाईन विक्रीचा व्यवसाया lबद्दल बोलत आहोत. तुम्ही पेट्रोल-डिझेल घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा सध्या नवीन व्यवसाय आहे. यामध्ये अद्याप कोणतीही स्पर्धा नाही.
नक्की वाचा:शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
2) ॲप बनवणे आवश्यक आहे :- 2016 पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी नव्हती. यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी दिली.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल तेल कंपन्यांना सादर करावा लागणार आहे. हा अहवाल अतिशय काळजीपूर्वक तयार करा आणि तो तेल कंपनीला सादर करा.
तेल कंपन्यांना तुमचा प्रकल्प आवडला तर तुम्हाला ऑनलाईन विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला ॲप किंवा वेबसाईट तयार करावी लागेल. याचे कारण म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन ऑर्डर द्यायची आहे.
नक्की वाचा:बिझनेस आयडिया: कालांतराने दुप्पट कमाई देणारा व्यवसाय आता सुरु करा, जाणून घ्या माहिती
3) गुंतवणूक किती असेल :- जर तुम्ही पेट्रोल-डिझेल होम डिलिव्हरी व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी तुम्हाला सुमारे 12 लाख रुपये गुंतवावे लागतील. तुमच्याकडे एवढी रक्कम नसेल तर तुम्ही पीएम मुद्रा लोन द्वारे कोणत्याही बँकेतून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.
4) नोएडामध्ये ऑनलाईन इंधनाचा व्यवसाय सुरु
मीडिया रिपोर्टनुसार नोएडामध्ये Pepfuel.com( स्टार्टअप Pepfuel.com) नावाने ऑनलाईन पेट्रोल-डिझेल वितरणाचा व्यवसाय सुरू आहे. पेप फ्युएलचा व्यवसाय 100 कोटींच्या पुढे गेला आहे. आज या कंपनीने चांगले स्थान प्राप्त केले आहे.
नक्की वाचा:कृषी व्यवसाय: सर्वात कमी गुंतवणुकीसह टॉप '6' कृषी व्यवसाय, देतील बक्कळ नफा
Share your comments