1. इतर बातम्या

तुम्हालाही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल जाणून घ्या सरकार किती देते यावर अनुदान

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे लोकांचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामध्ये पेट्रोल डिझेल चे वाढलेले दर आणि बऱ्याच प्रकारच्या पर्यावरणीय समस्या यामुळे सरकारचे प्रयत्नदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दिशेने होताना दिसत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
electric scooter

electric scooter

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे लोकांचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामध्ये पेट्रोल डिझेल चे वाढलेले दर आणि बऱ्याच प्रकारच्या पर्यावरणीय समस्या यामुळे सरकारचे प्रयत्नदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दिशेने होताना दिसत आहे.

शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाला विविध प्रकारच्या अनुदान लागू केल्याने अशा उद्योगांना देखील प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रिक बाइक्स किंवा चारचाकी खरेदी करायची असेल तर तुम्हाला किती अनुदान मिळू शकते या बद्दल एक माहिती असणे गरजेचे आहे. त्या लेखात आपण याबाबत माहिती घेऊ.

 इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेले अनुदान

 इलेक्ट्रिक वाहने हे घराघरापर्यंत पोहोचावेत यासाठी सरकारने FAME2 योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत सरकार अनुदान देत आहे. अगोदर या योजनेची मुदत ही 31 मार्च दोन हजार बावीस रोजी संपणार होती परंतु ती आता वाढवून एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी करण्यात आली आहे.

यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. सरकार या योजनेअंतर्गत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांवर पन्नास टक्के अधिक प्रोत्साहन देते. त्याच वेळी सरकारने दुचाकी वाहनांसाठी 15 हजार रुपये प्रति  KWh बॅटरी क्षमता, वाहन किमतीच्या 40 टक्क्यांपर्यंत नवीन प्रोत्साहन दिले आहे. तसेच नुकतेच इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ऑटो क्षेत्रासाठी उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. असे बरेचसे प्राथमिक अवस्थेत असलेले धोरणात्मक उपक्रम इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रातील स्टार्टअप साठी प्रोत्साहन देणारे ठरतील. यामध्ये नुसते केंद्र सरकारचा नाहीतर विविध राज्य सरकार देखील त्यांच्या त्यांच्या पातळीवर  अनुदान देत आहेत. 

याबाबतीत उदाहरणच द्यायचे झाले तर दिल्लीमध्ये ईथर 450 प्लस ची  किंमत कमी झाली आहे कारण त्यावर दिल्ली सरकार 14 हजार 500 रुपयांचा फायदा देणार आहे. त्यासोबतच दिल्ली सरकार विविध प्रकारच्या ई-कॉमर्स कंपन्या, आनंदा वितरण सेवा आणि कॅबकंपन्यांना संपूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सांगणार आहे.

English Summary: on elecctric scooter purchasing goverment give subsidy know that Published on: 11 February 2022, 05:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters