1. इतर बातम्या

रेशन कार्डाद्वारे वृद्धांना मोफत मिळते १० किलो धान्य; जाणून घ्या! काय आहे योजना

सरकारच्या एका योजनेतून वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला मोफत धन्न मिळते. या योजनेचे नाव आहे अन्नपुर्ण योजना. यासाठी आपल्याला रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून शासकीय कामे पुर्ण होत असतात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सरकारच्या एका योजनेतून वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला मोफत धन्न मिळते. या योजनेचे नाव आहे अन्नपुर्ण योजना. यासाठी आपल्याला रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून शासकीय कामे पुर्ण होत असतात. कोणत्याही शासकीय कामांसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. या कार्डच्या माध्यमातून सरकार नागरिकांना अनुदानावर धान्य पुरवत असते. दरम्यान सरकारने कोरोना काळात वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू केली. यातून लाखो गरीब लोकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान याची मर्यादा ही मार्च महिन्यापर्यंत वाढविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.  राज्य सरकार रेशन कार्डची सुविधा नागरिकांना देत असते. या रेशन कार्डातून अनेक वयस्कर नागरिकांना फायदेशीर असते. राज्य सरकारचे अन्न व पुरवठा विभागातून रेशन कार्ड मिळत असते. 

अन्नपुर्ण योजनेतून मिळते मोफत धान्य

दरम्यान सरकारच्या अन्नपुर्णा योजनेतून वृद्ध नागरिकांना मोफत धान्य देण्यात येते.  ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत नाही , तेही या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना रेशन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मोफत धान्य देण्याचा नियम आहे. ज्या नागरिकांना पेन्शन मिळत नाही त्यांना सरकार प्रत्येक महिन्याला १० किलो धान्य देत असते. यात ६ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ दिले जाते. ज्या वृद्धांचा मिळकती विषयी काही शाश्वती नसते, अशा नागरिकांना सरकार मोफत अन्न धान्य देते. या प्रवर्गात अत्यंत गरीब,आणि अभाव ग्रस्त नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.  ज्या कुटुंबातून त्याचे पालन- पोषण होत नाही अशा वृद्ध नागरिकांना अन्नपुर्ण योजनेत सहभागी करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेसाठी लागणार सर्व खर्च हा केंद्र सरकार घेत असते. राज्य सरकार फक्त कार्ड पुरवत असते. या योजनेतून दिले जाणारे रेशन कार्ड हे सफेद रंगाचे असते.

English Summary: Older people get 10 kg of foodgrains for free through ration card, find out what is the Scheme Published on: 30 October 2020, 02:12 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters