पोस्ट ऑफिस म्हटले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंतवणूक योजना पोस्ट खात्यामार्फत राबवल्या जातात. आपल्याला कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित कार्यालयांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसात संबंधित प्रक्रियेसाठी जावे लागते. यामध्ये वेळ तर जातोच परंतु एका फेरीत काम होईल याची कुठलीच शाश्वती नसते. त्यामुळे काही योजनांचा फायदा आपल्याला घरबसल्या घेता आला तर खूप उत्तम ठरेल असे बऱ्याच जणांच्या मनात येते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोस्ट ऑफिसने देखील किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सारख्या महत्वपूर्ण योजना या आता ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहेत.
नक्की वाचा:पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा
पोस्ट ऑफिसचा या बाबतीतला प्लॅन
याबाबतीत पोस्ट ऑफिसने 18 ऑगस्ट 2022 रोजी एक अधीसूचना जारी करून त्यानुसार आता इंटरनेट बँकिंगसाठी नोंदणी केलेले पोस्ट ऑफिस ग्राहक आता किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजना ऑनलाइन ओपन करू शकतात किंवा त्याबद्दल देखील करू शकता. म्हणजे तुम्ही आता अगदी घर बसून या योजनांचा फायदा घेऊ शकतात.
यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची लागेल आवश्यकता
जर या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर इंटरनेट बँकिंग अत्यावश्यक आहे. किसान विकास पत्र किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खाते उघडण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजेच डीओपी इंटरनेट बँकिंग वापरणारे खातेदार या दोन्ही योजनांचे खाते घरी बसून उघडू शकतात.
तुम्हाला या सेवेचा फायदा घ्यायचा असेल तर 'सर्विस रिक्वेस्ट ऑफ जनरल सर्विसेस' या पर्यायावर क्लिक करावे व त्यानंतर किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खात्याचा पर्याय येईल व त्यानुसार तुम्हाला कोणते खाते उघडायचे आहे त्यावर क्लिक करावे लागेल.
Share your comments