आताचे जमान्यात इंटरनेट शिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. जीवनाचे कुठलेही क्षेत्र असो त्यामध्ये ऑनलाइन हे सगळे इंटरनेट शिवाय शक्य नाही. क्षेत्राचा विचार केला तर बँकिंग क्षेत्रातील सगळी कामे ऑनलाइन होत असल्यामुळे इंटरनेट गरजेचे आहे.
अगदी तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यापासून तर एखाद्याला पैसे पाठविण्याचे काम देखील ऑनलाइन पद्धतीने होत असते. मला आपल्याला माहिती आहे ऑनलाइन कामकाज म्हटले म्हणजे इंटरनेट हवच. इंटरनेट नसेल तर आपण कोणालाच ऑनलाईन पैसे पाठवू शकत नाही. परंतु आत्ता भारतीय रिझर्व बँकेने असे नियोजन केले आहे की इंटरनेट नसले तरीसुद्धा ऑफलाइन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करता येणार आहे. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
काय आहे रिझर्व बँकेची योजना?
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना या सुविधेबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रिझर्व बँकेने देशभरात ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी एक पद्धती आणली आहे. या ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करण्याचे व्यवस्थेचे तीन पायलट प्रोजेक्ट आतापर्यंत देशात राबविण्यात आले आहेत.आता ही योजना संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे.
देशात ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी या ऑफलाइन पेमेंट पद्धतीचा फायदा होईल. या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात सुरू होणार आहे. तसे पाहायला गेले तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने या योजनेची घोषणा 6 ऑगस्ट 2020 रोजी केली होती.
परंतु यावर अजूनही चाचणी सुरू आहे. सप्टेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीमध्ये तीन पायलट प्रोजेक्ट देशात राबविण्यात आले. हे प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आता संपूर्ण देशात योजना लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या पायलट प्रोजेक्ट मध्ये कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये ट्रान्सफर करता येत होते. येणाऱ्या काही दिवसात लवकरच आता सर्वांना आपलं पेमेंट करता येणार आहे.
Share your comments