आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांची पैकी एक कागदपत्र असून कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ किंवा कुठल्याही शासकीय काम असो यासाठी आज काल आधार कार्ड अनिवार्य आहे. परंतु बऱ्याचदा तेव्हा आधार कार्डची इमर्जन्सी गरज असते त्यावेळेस ते कुठेतरी ठेवले जाते किंवा सापडत नाही याचा अनुभव बर्याच जणांना आलेला असेल.
त्यामुळे आपली कामे तर रखडतातच परंतु पुढे काय करावे? हा प्रश्न मनात निर्माण होतो. परंतु आता काळजी करण्याचे कारण नसून तुम्ही काही सोप्या आणि साध्या गोष्टी केल्या तर तुम्हाला डुप्लिकेट आधारकार्ड मिळते.
आधार कार्ड चे वैशिष्ट्य म्हणजे ओरिजनल आधार कार्ड इतकेच ते व्हॅलिड आहे. यासाठी युआयडीएआयएने प्रिंट आधार कार्ड नावाची सुविधा उपलब्ध केली आहे. नेमका या सुविधेचा वापर कसा करावा?हे आता आपण समजून घेऊ.
अशा पद्धतीने बनवा डुप्लिकेट आधार कार्ड
1- यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला युआयडीएआयच्या पोर्टल वर जावे लागेल त्या ठिकाणी ऑर्डर आधार रिप्रिंट या पर्यायावर क्लिक करा.
2- याठिकाणी तुम्ही तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर टाकावा किंवा सोळा अंकी वर्चुअल आयडी आणि सिक्युरिटी कोड टाकावा.
3- त्यानंतर सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा तुमचे आधार कार्डचा मोबाईल क्रमांक अशी लिंक आहे त्यावर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होतो. त्यानंतर हा प्राप्त झालेला ओटीपी त्याठिकाणी टाका आणि सबमिट बटन दाबा.
4- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आधार प्रिव्ह्यू असा एक विभाग त्याठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आधार कार्डचा सर्व तपशील पाहू शकतात.
5- त्या ठिकाणी तुमचे नाव किंवा तुमच्या संबंधित असलेली माहिती व्यवस्थित चेक करून ती बरोबर आहे का? हे तपासून घेतल्यानंतर मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करावी.
6-पेमेंट करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग,डेबिट किंवा क्रेडिट कार्ड इत्यादी पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. यापैकी पेमेंट करण्यासाठी तुम्ही तुम्हाला योग्य तो पर्याय निवडू शकतात.
7- तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्ड मिळण्यासंबंधी ची तुमची विनंती मान्य केली जाईल आणि एक सर्विस रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल.
8- यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची प्रिंट काढता येईल व तुमच्या कामासाठी वापरता येईल.
नक्की वाचा:Seasonal Bussiness Idea: 'या'हंगामात सुरू करा हा व्यवसाय आणि कमवा घरबसल्या बक्कळ पैसा
Share your comments