मित्रांनो भारतात सरकारी कामात अनेक कागदपत्रांची गरज पडते अशाच कागदपत्रापैकी एक आहे रेशनकार्ड. रेशनकार्ड हे अनेक सरकारी कामात एक अनिवार्य डॉक्युमेंट आहे. रेशनकार्ड हे राज्य सरकार द्वारा आपल्या नागरिकांसाठी जारी केले जाते.
रेशन कार्ड हे मुख्यता रेशन घेण्यासाठी तसेच रहिवाशी पुराव्यासाठी वापरले जाते. रेशन कार्ड त्यामुळे एक महत्वाचे डॉक्युमेंट समजले जाते. रेशन कार्ड हे गरीब लोकांना कमी भावात राशन मिळवून देते, असे असले तरी असे अनेक लोक आहेत ज्यांना अजून रेशनकार्ड मिळालेले नाही आहे. त्यामुळे अनेक गरीब लोक स्वस्त दरात मिळणारे राशन घेण्यास मुकतात. त्यामुळे आज आपण घरबसल्या राशन कार्ड कशे बनवायचे ह्याविषयीं जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया रेशन कार्ड बनवण्याची प्रोसेस.
ह्या पद्धतीने करा रेशन कार्डसाठी अँप्लिकेशन
»मित्रांनो जर आपल्याकडे अजून रेशनकार्ड नसेल आणि आपल्याला रेशन कार्ड काढायचे असेल तर सर्व्यात आधी आपणांस राज्य सरकारच्या फूड पोर्टल वर अर्थात ऑफिसिअल वेबसाईटवर जावावे लागेल.
»वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला रेशन कार्ड बनवण्यासाठी एक अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
त्याबरोबर आपणांस आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल तसेच आपणांस आपले आधार कार्ड,वोटर आयडी कार्ड, आपले पासपोर्ट साईजचे फोटो, बँक खात्याची माहिती इत्यादी डॉक्युमेंट हे द्यावे लागतील.
»हे एवढे सर्व जमा केल्यानंतर आपणांस ह्यासाठी काही वाजवी शुल्क देखील भरावा लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल त्यानंतर तुमचा हा फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी फील्ड व्हेरिफाय केला जातो.
जर आपण दिलेली माहिती यथायोग्य असेल तर आपला फॉर्म हा अँप्रोव्ह केला जातो आणि 30 दिवसात आपले रेशन कार्ड हे बनून तयार होते.
ह्या गोष्टींची काळजी घ्या
»मित्रांनो रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांना दिले जाते.
»तसेच ज्या लोकांना रेशन कार्ड हवे आहे ती व्यक्ती 18 वर्ष पूर्ण झालेली असावी.
»एका व्यक्तीला एकाच राज्याचे रेशन कार्ड हे मिळू शकते.
Share your comments