1. इतर बातम्या

महत्वाचे! आपले आधार कार्ड कोणी चुकीच्या पद्धतीने वापरतेय का? 'ह्या' पद्धतीने करा चेक

नमस्कार कृषी जागरणच्या वाचकांनो! अलीकडे भारतात आधार कार्ड एक ऑल इन वन डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्ड हे इतर सर्व डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड हे लहानग्या पासुन मोठ्या व्यक्ती पर्यंत सर्व्यांसाठी एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. आधार कार्ड बँकिंग क्षेत्रापासून ते सर्व महत्वाच्या सरकारी कामात उपयोगी पडते. आधार कार्डशिवाय अनेक महत्वाची कामे हि अटकून पडतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ADHAAR CARD

ADHAAR CARD

नमस्कार कृषी जागरणच्या वाचकांनो! अलीकडे भारतात आधार कार्ड एक ऑल इन वन डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्ड हे इतर सर्व डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड हे लहानग्या पासुन मोठ्या व्यक्ती पर्यंत सर्व्यांसाठी एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. आधार कार्ड बँकिंग क्षेत्रापासून ते सर्व महत्वाच्या सरकारी कामात उपयोगी पडते. आधार कार्डशिवाय अनेक महत्वाची कामे हि अटकून पडतात.

आधार कार्ड शिवाय कुठलीच सरकारी योजनेचा लाभ आपल्याला घेता येत नाही. अशा महत्वाच्या डॉक्युमेंटचा अनेक वेळेस गैरवापर देखील आपल्याला पाहवयास मिळत असेल. आपल्याला नेमकं ठाऊक नसते की आपले आधार कार्ड हि किती ठिकाणी नेमकं वापरलं जात आहे. जर आपणांसहि माहित नसेल की, आपले आधार कार्ड नेमकं कुठे कुठे वापरले जात आहे आणि मनात भीती असेल की आपल्या आधारचा कुणी गैरवापर करत आहे तर चिंता करू नका आज आम्ही आपणांस आपले आधार कार्ड कुठे कुठे वापरलं जात हे कसं काय चेक करायचे याविषयीं महत्वाची माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याविषयीं सविस्तर माहिती.

आधार कार्ड जारी करणारी संस्था अर्थात Uidai आपल्याला आधार कार्डची हिस्टरी चेक करण्याची सुविधा पुरवते आज आपण या सुविधेचा लाभ घेऊन आपले आधार कार्डची हिस्टरी कशी चेक करायची याची प्रोसेस जाणुन घेणार आहोत.

आधार कार्डची हिस्टरी चेक करण्याची प्रोसेस….

मित्रांनो जर आपणांस आपल्या आधार कार्डची हिस्टरी चेक करायची असेल तर आपणांस सर्वप्रथम https://resident.uidai.gov.in/ ह्या ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वेबसाईटच्या वरच्या बाजूला उजव्या कोपर्‍यात My आधार असा पर्याय आपणांस दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर, Aadhar Authentication History हा पर्याय दिसेल त्या त्यावर क्लिक करा. ह्या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल तसेच त्याखाली असलेला कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर एक टॅब उघडेल, जिथे तुम्हाला आधारकार्डचा जेवढा इतिहास पाहायचा असेल तेव्हापासूनच्या तारखा भराव्या लागतील.  तसेच OTP साठी आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी पडताळावा लागेल. एवढी प्रोसेस केल्यानंतर आपला आधार इतिहास समोर येईल. आपल्याला जर आधार कार्डचा इतिहास डाउनलोड करायचा असेल तर आपण तो डाउनलोड देखील करू शकता.

जर आपल्याला आपले आधार कार्ड चुकीच्या ठिकाणी वापरले जात आहे असे जाणवले तर आपण 1947 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता.

English Summary: now you can check anyone misuse of your adhaart card by this way Published on: 22 November 2021, 06:08 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters