
adhaar card
पोस्ट खात्याने आता राज्यातील काही निवडक टपाल कार्यालयामार्फत व पोस्टमन मार्फत 0 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुलांचे नवीन आधार कार्ड म्हणजे बाल आधार कार्ड आणि त्यासोबतच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी ची विशेष मोहीम हाती घेतली आहे
त्यानुसार आता पाच वर्षे वयोगटातील लहान मुलांना आधार कार्ड काढण्यासाठी आधार सेवा केंद्रावर किंवा ई सेवा केंद्र येथे जाण्याची कुठल्याही प्रकारचे आवश्यकता नसून लहान मुलांचे बाल आधार कार्ड आता पोस्टमन मार्फत मोफत काढून दिली जाणार आहे. आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
सध्य परिस्थितीत नवीन आधार कार्ड काढण्याचे काम मोजक्याच आधार केंद्रामार्फत सुरू आहे.यामुळे नागरिकांना नवीन आधार कार्ड काढणे आणि आधार कार्ड मध्ये दुरुस्ती किंवा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता भारतीय पोस्ट खात्यामार्फत आधार मोबाईल नंबर लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे आधार कार्ड आता पोस्टामार्फत घरपोच काढून देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोस्टमन आपल्या मोबाईल मधून लहान मुलांचा फोटो घेऊन तो अपलोड करणार आहे.
Share your comments