EPFO: ईपीएफओ बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता घरबसल्या PF बॅलन्सची माहिती मिळवता येणार आहे. पीएफ बॅलन्सची माहिती या 4 पद्धतीनुसार मिळवू शकता... कसे ते जाऊन घ्या
नंबरद्वारे बॅलन्सची माहिती
पीएफ अकाउंट होल्डरने जो नंबर रजिस्टर केलेला असेल त्या नंबरद्वारे 011-22901406 या नंबरला मिस्ड कॉल करावा. मिस्ड कॉल केल्यानंतर काही वेळेतच रजिस्टर मोबाईलनंबरला एसएमएसमार्फत पीएफ बॅलन्सची माहिती मिळेल.
SMS द्वारे मिळवा माहिती
रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे कॉल शिवाय पीएफ अकाउंट होल्डर SMS द्वारे देखील पीएफ बॅलन्सची माहिती मिळवता येते.
पीएफ बॅलन्सची माहिती
1. रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे 7738299899 नंबरवर एसएमएस करा.
2. EPFO UAN LAN टाईप करा. (या ठिकाणी LAN म्हणजे भाषा असा अर्थ होतो.)
3. जर तुम्हाला पीएफबद्दलची माहिती इंग्रजी भाषेत पाहिजे असेल तर LAN ऐवजी ENG असं लिहावं आणि हिच माहिती हिंदी भाषेत पाहिजे असेल तर LAN ऐवजी HIN असं टाईप करा.
वेबसाईटद्वारे माहिती
EPF च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील पीएफबद्दलची माहिती मिळवता येते.
Share your comments