
image credit goes to autowaale
मारुती सुझुकी देशातील एक प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार देशात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहेत. या कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार देशात सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे.
लॉन्चिंग झाल्यापासून या 'कार'ने अनेक विक्रम मोडीत काढले आणि कंपनीसाठी एक मोठा रेव्हेन्यू जमा करून दिला आहे. ही कार आपल्या स्टायलिश लूक मुळे आणि किमतीमुळे देशातील अनेक लोकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. मित्रांनो जर आपण देखील या कारचे शौकीन असाल आणि ही कार खरेदी करायची असेल, तर ही कंपनी आपल्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे. कंपनीने या दमदार गाडीवर एक मोठी तगडी ऑफर ठेवली आहे.
कंपनीने या कारवर मोठी डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे, यामुळे या कारवर मोठी बचत शक्य होणार आहे. परंतु कंपनीने ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी सुरू ठेवली आहे त्यामुळे जर आपणास ही कार खरेदी करायची असेल तर या महिन्यातच खरेदी करावी लागणार आहे. कारण की, कंपनीने या महिन्यापर्यंत ही भन्नाट ऑफर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
किती मिळतोय डिस्काउंट?- मित्रांनो जर आपण ही कार या महिन्यात खरेदी केली तर आपणास तब्बल 27 हजार रुपयांचे डिस्काउंट दिले जाणार आहे. मात्र, तुम्ही या कारचे ऑटोमॅटिक व्हेरीयंट जर खरेदी केले तर केवळ 17 हजार रुपये डिस्काउंट दिले जाणार आहे. आपण या डिस्काउंट विषयी अधिक माहिती आपल्या कंपनीच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून जाणून घेऊ शकता.
Share your comments