1. इतर बातम्या

ये हुईना बात! फक्त 8000 रुपये डाउनपेमेंटवर मिळेल होंडा ऍक्टिव्हा 6G

अलीकडे देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटरची खपत वाढली आहे. पेट्रोलच्या दरात भरमसाठ वाढ होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही अनेक लोकांना पेट्रोल स्कूटर वापरणे विशेष पसंत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
honda activa

honda activa

अलीकडे देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटरची खपत वाढली आहे. पेट्रोलच्या दरात भरमसाठ वाढ होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही अनेक लोकांना पेट्रोल स्कूटर वापरणे विशेष पसंत आहे.

भारतीय बाजारात होंडा एक्टिवा ही पेट्रोल स्कूटर सर्वात जास्त विक्री होते. आपल्या स्टायलिश लूक मुळे आणि दमदार फिचर्समुळे ही स्कूटर लोकांना विशेष आवडते. होंडा एक्टिवा 6G हे ॲक्टिवा स्कूटर चे अपग्रेडेड वर्जन आहे, या स्कूटरची देखील मोठी मागणी असते. या स्कूटरची सुरुवाती एक्स शोरूम किंमत 70,599 एवढी आहे. मित्रांनो, जर आपणास ती स्कूटर खरेदी करायची असेल तर या स्कूटरवर सुरू असलेल्या एका भन्नाट ऑफर विषयी अवश्य जाणून घ्या.

मित्रांनो, जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आपण ही स्कूटर खूपच कमी डाऊन पेमेंट करून घरी आणू शकता. ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, आपण होंडा एक्टिवा 6g ती स्कूटर केवळ आठ हजार रुपये डाऊन पेमेंट लावून खरेदी करू शकता. अर्थात ही स्कूटर खरेदी करण्यासाठी 73 हजार 907 रुपये कर्ज उपलब्ध होऊन जाते. जर आपण आठ हजार रुपये डाऊन पेमेंट लावून स्कूटर खरेदी केली तर 2274 रुपयाचा मासिक हप्ता अर्थात ईएमआय आपल्याला तीन वर्षेपर्यंत भरावा लागेल. 

या कर्जावर बँकेकडून 9.4 टक्के दराने व्याज दर आकारला जातो. मित्रांनो असे असले तरी, डाऊन पेमेंट, मंजूर होणारे कर्ज आणि मासिक हप्ता यामध्ये आपल्या सिव्हिल स्कोर नुसार कमी जास्त होऊ शकतो, आम्ही आपणास माहिती देण्याच्या दृष्टिकोनाने फक्त एक अंदाज सांगितला आहे. स्कूटर खरेदी करताना आपण आपल्या जवळच्या होंडा डीलरशिपशी कॉन्टॅक्ट करून उपलब्ध असलेल्या ऑफर विषयी नक्की चौकशी करू शकता.

English Summary: now honda activa 6g is available at 8000 minimum downpayment Published on: 08 March 2022, 04:27 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters