सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीसमवेतच गॅस सिलिंडरच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालत आहेत. म्हणून नव्याने गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हाती पडलेल्या माहितीनुसार आता गॅस सिलेंडर स्वस्तात मिळणार आहे. देशातील सरकारी गॅस कंपन्यांनी वाढत्या सिलेंडरच्या किमती लक्षात घेता ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय समोर आणला आहे. या पर्यायाद्वारे देशातील नागरिकांना गॅस सिलेंडर आता मात्र 633 रुपयात मिळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
एकीकडे गॅस सिलिंडरच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर होत असताना भारतातील इंडेन कंपनीने यावर एक भन्नाट योजना अस्तित्वात आणली आहे. या पर्यायाद्वारे मध्यमवर्गीयांचा फायदा होणार असल्याचे कथन कंपनीद्वारे केले जात आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती लक्षात घेता इंडेन कंपनीने अवघ्या 633 रुपयात गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. इंडेन कंपनीने आपल्या हजारो ग्राहकांच्या सोयीसाठी एक विशिष्ट सिलेंडर बाजारात उतरविले आहे या सिलेंडरला कंपोझिट सिलेंडर म्हणून संबोधले जाते. हा सिलेंडर ग्राहकांना अवघा 633.5 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय या सिलेंडरची सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा सिलेंडर एका जागेहून दुसर्या जागी ने-आन करण्यासाठी अतिशय सोपा आहे.
कंपोझिट सिलेंडर आपल्या नेहमीच्या सिलेंडर पेक्षा वजनाने हलका असतो त्यामुळे सतत एका जागेहून दुसर्या जागी स्थलांतर करणार्या लोकांसाठी या सिलेंडरचा विशेष उपयोग होत असतो. या सिलेंडर मध्ये मात्र दहा किलो गॅस बसत असल्याने या सिलेंडरची किंमत कमी असते. हा कंपोझिट किंवा छोटू सिलेंडर सध्या देशातील 28 शहरात उपलब्ध आहे आणि लवकरच कंपनी संपूर्ण भारत वर्षात या सिलेंडरची उपलब्धता करून देणार आहे. हा सिलेंडर नोकरीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी स्थलांतर करणाऱ्या लोकांसाठी उपयोगाचा असतो.
सिलेंडरच्या किंमतीत अद्याप तरी कुठल्याही प्रकारची घट झालेली नाही मात्र या कंपोझिट सिलेंडर मध्ये गॅस कमी बसत असल्याने याची किंमत कमी आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना कमी पैशात सिलेंडर उपलब्ध होतो मात्र असे असले तरी यामध्ये केस देखील कमी येतो पण एकाच वेळी 1000 रुपये देण्यापेक्षा हा सिलेंडर 633 रुपया मध्येच मिळत असल्याने याचा फायदा नागरिकांना होत आहे.
Share your comments