शासनाकडून शेतकऱ्यांच्या लाभासाठी अनेक योजना राबवल्या जातात. अनेकजणांना या योजनांची माहिती होते, त्यातील काही जण या योजनांचा लाभ देखील घेतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नसते. यामुळे ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करत करत शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असते. विविध योजनांचा विविध अर्ज असतात असा असंख्य समस्यांमुळे अनेक जण या योजनांपासून दूर राहतात. पण आता तसे होणार नाही.
शेतकऱ्यांना एकाच अर्जावरून विविध योजनांचा लाभ मिळेल, यासाठी सरकारने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. यामुळे महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात देखील सगळे वर्क फ्रॉम होम करत असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. सरकारी योजनांची माहिती या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
नोंदणी कुठे कराल -
शासनाच्या विविध योजनांसाठी शेतकरी बंधूना आता या पोर्टलवरील लिंकवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. – https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्वाचे आहे त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.
Share your comments