पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे.परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन हे असे एक महत्वाचे कागदपत्र आहेजेकोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला जर बँकेत खाते उघडायचे असेल किंवा कुठेही गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला पॅन कार्ड ही लागतेच.
पॅन कार्ड 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरदिले जाते.परंतु आता वयाच्या अठरा वर्षांपूर्वी देखील पॅन कार्डसाठी अर्ज करता येऊ शकतो. तो अर्ज कसा करायचा? त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
अठरा वर्षाखालील मुलांचे पॅन कार्ड
18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा? त्याची प्रक्रिया काय असणार आहे याविषयी माहिती पाहूया.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर सुरुवातीलाNSDL च्या वेबसाईटवर जावे.
- अर्जदाराची योग्य श्रेणी निवडून सर्व वैयक्तिक माहिती भरावी.
- अल्पवयीन असलेल्या मुलाचे वयाचा पुरावा आणि पालकांच्या फोटोसह इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावे.
- पालकाची स्वाक्षरी अपलोड करावी.
- 107 रुपये फी भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करावा.
- त्यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल,या क्रमांकावरून तुम्हीकेलेल्या अर्जाची स्टेटस तपासू शकता.
- त्याच वेळी अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक मेल येतो.
- त्याचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसात पॅन कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचते.
पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रांची आवश्यकता
- अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक
- अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक असतो.
- यासोबतच अल्पवयीन मुलाच्या पालकांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड,रेशन कार्ड,पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसन्स,मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक द्यावे लागणार.
- पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड,पोस्ट ऑफिस पासबुक,मालमत्ता नोंदणी दस्तऐवज किंवा मूळ रहिवाशी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.
- अल्पवयीन व्यक्ती स्वतः कमावत असेल, तुम्हाला तुमच्या मुलाला गुंतवणुकीचे नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनी करायचे असेलकिंवा मुलाच्या नावावर गुंतवणूक केली असेल तर मुलांना पॅन कार्ड आवश्यक आहे.
Share your comments