कुठलेही वाहन चालवायचे असेल तर त्यासाठीड्रायव्हिंग लायसन्सची नितांत आवश्यकता असते. कारण विना परवाना वाहन चालवणे आहे कायदेशीर गुन्हा आहे
परंतु एका कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉंच केले आहे व त्या कंपनीचे नाव आहे क्रेयॉन मोटर्स.या कंपनीने Snow+ नावाची स्कूटर लॉंच केले असून ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन ची गरज भासणार नाही. कारण क्रेयॉन मोटर्सचीइलेक्ट्रिक स्कूटर कमी गतीचे आहे. क्रेयॉन मोटर्सने ही लो स्पीड इलेक्ट्रिक टू व्हीलर 64 हजार रुपयांना बाजारात आणली आहे ही स्कूटर चार रंगांमध्ये उपलब्ध असून ते म्हणजे सनशाइन यलो, क्लासिक ग्रे, फायरी रेड आणि सुपर व्हाईट याच्या रंगांमध्ये ही उपलब्ध आहे.
या स्कूटर सोबत दोन वर्षाचीवारंटी देखील आहे. हलक्या कामाच्या गरजांसाठी ही स्कूटर डिझाईन केली असून या इलेक्ट्रिक स्कूटर चे टॉप स्पीड 25 Kmphइतका आहे. या बाबतीत बोलताना क्रेयॉन मोटर्सचे सहसंस्थापक आणि संचालक मयंक जैन म्हणाले की, आम्ही लो स्पीड इ स्कूटर ची सुरुवात केली असूनआता हायस्पीड कडे आम्ही वाटचाल करीत आहोत.
शहरी भागाचा विचार केला तर दैनंदिन वापरासाठी ग्राहकांना लो स्पीड इ स्कूटर हा चांगला पर्याय ठरेल.ग्राहकांच्या गरजा या स्कूटर द्वारे पूर्ण केल्या जातील त्यामुळे त्यांना कोणताही त्रासाशिवाय एक किफायतशीर आणि एक आनंददायी प्रवास अनुभव मिळेल.(स्त्रोत-सकाळ)
Share your comments