नोकियाचा विचार केला तर ही कंपनी एक स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. मुळात भारताला मोबाईल फोनची ओळखच नोकिया कंपनीने करून दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्मार्टफोनच्या बाबतीत नोकिया म्हटलं म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये एक विश्वासाचे स्थान निर्माण केलेली ही कंपनी आहे. या पार्श्वभूमीवर नोकिया कंपनीच्या एका स्मार्टफोनच्या बाबतीत अपडेट समोर आले असून या कंपनीने नुकताच एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या लेखांमध्ये या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊ.
नोकियाने लॉन्च केला G60 5G स्मार्टफोन
नोकियाने नुकताच नवीन स्मार्टफोन G60 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून यामध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय 6.58 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देखील देण्यात आला असून यामध्ये फाईव जी कनेक्टिव्हिटी चे सुविधा आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर तसेच पाच मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड अँगल सेंसर आणि दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. हा फोन ब्लॅक आणि आईस कलर अशा दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
त्यामध्ये सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली असून 120Hz, फुल एचडी+ रिझोल्युशन (1080×2400 पिक्सल) च्या रिफ्रेश रेटसह साडेसहा इंचाचा डिस्प्ले आहे.
नक्की वाचा:कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट
स्क्रीनचे संरक्षण करता यावे यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास पाच देण्यात आला आहे. जर या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता पाहिली तर ती 4500mAh ची असून त्यामध्ये 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी साठी यामध्ये ब्लूटूथ 5.1,3.5 मीमी जॅक, एक टाईप सी पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय समाविष्ट आहे.
किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
नोकिया G60 5G हा स्मार्टफोन भारतात 29 हजार 999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
नक्की वाचा:सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या
Share your comments