1. इतर बातम्या

नोकियाचा 2760flip झाला लॉन्च तब्बल 18 दिवस टिकणार चार्जिंग, पाहू या फोनची वैशिष्ट्ये

एकेकाळची मोबाईल फोनच्या दुनियेत सगळ्यात प्रसिद्ध आणि ख्यातनाम कंपनी नोकिया सगळ्यांच्याच लक्षात आहे. आता नुकताच नोकियाने फोल्डेबल नोकिया 2760 Flip लॉन्च केला आहे. या लेखामध्ये या फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-nokiapoweruser

courtesy-nokiapoweruser

एकेकाळची मोबाईल फोनच्या दुनियेत सगळ्यात प्रसिद्ध आणिख्यातनाम  कंपनी नोकिया सगळ्यांच्याच लक्षात आहे. आता नुकताच नोकियाने फोल्डेबल नोकिया 2760 Flip लॉन्च केला आहे. या लेखामध्ये या फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

नोकिया 2760 Flip फोनची वैशिष्ट्ये

 या फोनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनची किंमत खूपच कमी असून यामध्ये ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे.HMD ग्लोबल सतत नवीन नोकिया फोन लॉन्च करत असते यामध्ये एचएमडी ग्लोबल नवीन लुक मध्ये जुन्या मॉडेल्स ला पुन्हा बाजारात आणत आहे. यावेळी नोकिया 2760 फिचर लॉंच करण्यात आले आहे. या फोनची किंमत US मध्ये पंधराशे रुपयाच्या आसपास आहे. या फोनमध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले तसेच पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मजबूत बॅटरी देण्यात आली आहे.2.83 इंची एलसीडी स्क्रीन आणि 1.77इंचाची बाह्य  स्क्रिन आहे. 

यामध्ये 1.3GHzक्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच 4 जीबीची इंटरनल मेमरी आणि 512 एमबी रॅम आहे. या फोनमध्ये सेन्सर फ्लॅश सोबत 5 मेगापिक्सल कॅमेरा, कॅल्क्युलेटर, अलार्म आणि वेब ब्राउझिंग सारखे मूलभूत वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये अनेक ॲप देखील देण्यात आले आहेत जसे की फेसबुक आणि व्हाट्सअप सारखे ॲप्स प्रीलोड  केलेले आहेत. तसेच 4g इंटरनेट देखील आहे.  या फोनमध्ये 1450mAhडीटेचेबल बॅटरी आहे. 

याबद्दल नोकिया ने दावा केला आहे की एकदा चार्जिंग केल्यावर या फोनला अठरा दिवसांचा स्टॅंडबाय टाइम मिळतो. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी ब्लूटूथ, साडेतीन मीमी हेडफोन जॅक, सी टाइप सब कनेक्शन, वाय-फाय सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.(स्रोत-दैनिकगोमंतक)

English Summary: nokia 2760 flip mobile phone launch in india in affordabel price Published on: 07 March 2022, 07:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters