वातावरणातील वाढते प्रदूषण आणि पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर पाहता बरेच लोक सायकलला पसंती देताना दिसून येत आहेत. ड्रायव्हर साठी देखील सायकल आहे उत्तम पर्याय आहे.
जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर सायकली मध्ये काळानुसार वेगवेगळे बदल करून अनेक प्रकारच्या सायकली मार्केटमध्ये येतच आहेत. त्यामध्ये सध्या Nexzu Mobility e-cycle स्वदेशी ई मोबिलिटी ब्रँड नेक्सझु मोबिलिटी ने नेक्सझु बाझिंगा लॉन्ग रेंज ई सायकल लॉन्च केली आहे. या सायकलची रेंज जवळजवळ 100 किमी इतके आहे.
नेक्सझू बाझिंगा सायकल ची वैशिष्ट्ये
नेक्सझु मोबिलिटी या कंपनीने बाझिंगा ई सायकल यूनिसेक्स ई सायकल म्हणून सादर केली आहे. लिथियम आयन बॅटरी सह येणाऱ्या सायकलवरून चालक सहज उतरव आणि चढूशकतात. या सायकलची वजन वाहून नेण्याची क्षमता 15 किलोच्या आसपास आहे.नेक्सझू मोबिलिटी कंपनी परवडणाऱ्या इ स्कूटर आणि ईसायकल सह अनेक उत्पादनांची श्रेणी ऑफर करते. या कंपनीचे 100 पेक्षा जास्त डिलर टच पॉइंट्स आहेत.
या सायकलची किंमत किती आहे?
शंभर किलोमीटर पर्यंत ची रेंज देणाऱ्या बाझिंगा ई सायकलची किंमत कंपनीकडून 49 हजार 445 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी 51 हजार 525 रुपयाच्या किमतीत बाझिंगा कार्गो चा आणखी एक प्रकार आणण्यात आला आहे.नेक्सझू मोबिलिटी ग्राहकांना झेस्ट मनी द्वारे ईएमआय पर्याय सुलभ पेमेंट पर्यायी वापर करतआहे. सध्या ई सायकल नेक्सझू मोबिलिटी इ कॉमर्स वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर प्री बुकिंग साठी उपलब्ध आहे.
Share your comments