Petrol Diesel Price Today: देशात महागाईचा आकडा वाढतच आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. आजही भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मात्र या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे राज्यातील जनेतील थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
बळीराजाला नुकसान भरपाईची आस! खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण...
सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या (Crude Oil) किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
खुशखबर! या दिवशी येणार पीएम किसान योजनेचा 12वा हफ्ता; या लोकांना बसणार धक्का...
आजची किंमत किती आहे
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
सोने चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोने 4000 तर चांदी 21800 रुपयांनी स्वस्त, पहा नवे दर...
गोमुत्राचा वापर पिकांना ठरणार रामबाण उपाय! उत्पन्नात होणार भरघोस वाढ; जाणून घ्या...
Share your comments