1. इतर बातम्या

Paper Napkin Making Business: "हा" व्यवसाय सुरु करा आणि कमवा वर्षाकाठी 12 लाख रुपये

मित्रांनो जर आपणांस व्यवसाय (Business) सुरु करायचा असेल पण सुचत नसेल कुठला व्यवसाय सुरु करावा तर ही बातमी खास तुमच्यासाठी! आज आम्ही ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांच्यासाठी भन्नाट व्यवसायाची कल्पना (Business Idea) घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेद्वारे लोन देखील प्राप्त केले जाऊ शकते. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो आहे पेपर नॅपकिन मेकिंग बिजनेस (Paper Napkin Making Business). जर आपणास देखील व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण हा व्यवसाय सुरु करून लाखों रुपये वर्षाकाठी अगदी सहज कमवू शकता चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया या प्रॉफि्टेबल बिजनेसविषयी सविस्तर माहिती.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image courtesy us foods

मित्रांनो अलीकडे, बदलत्या मानवी जीवनशैलीत (human lifestyle) टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा वापर अधिक होऊ लागला आहे. सहसा ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो. आजकाल नॅपकिन पेपर रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, ऑफिस, हॉस्पिटल अशा जवळपास सर्वत्र वापरले जाते. आज आम्ही आपणांस टिश्यू पेपरचा (tissue paper) व्यवसाय कसा सुरू करायचा ते सांगणार आहोत, त्यासाठी किती खर्च येईल आणि किती कमाई होईल? हे देखील आज आपण जाणुन घेणार आहोत.

किती करावी लागेल इन्व्हेस्टमेंट (How much to invest)

जर आपणास पेपर नॅपकिन मेकिंग बिजनेस अर्थात टीशु पेपर मेकिंग बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्हाला सुमारे 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही पंतप्रधान मोदी यांच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्यामुळे, तुम्हाला बँकेकडून सुमारे 3.10 लाख रुपये मुदत कर्ज आणि 5.30 लाखांपर्यंतचे वर्किंग कॅपिटल मिळेल. एकंदरीत आपणास हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 12 ते 13 लाख रुपये लागतात.

किती होणार कमाई (How much will be earned)

मित्रांनो नॅपकिन पेपर मेकिंग बिजनेस एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो, एवढी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एका वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार होऊ शकतात. सुमारे 65 रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होऊ शकते.  म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. यातील सर्व खर्च काढून टाकल्यास वर्षाला सुमारे 10-12 लाख रुपयांचा आपणास निव्वळ नफा राहु शकतो. आम्ही सांगितलेल्या आकडयात कमी जास्त होऊ शकतो.

English Summary: napkin paper making business is very profitable business learn about it Published on: 31 December 2021, 10:42 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters