भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्डचे महत्व आपणांस सर्वाना ठाऊकच आहे. पॅन कार्ड वित्तीय कामासाठी सर्व्यात महत्वाचा दस्ताऐवज आहे. बँकिंग कामासाठी, वित्तीय व्यवहार करण्यासाठी, आयकर भरण्यासाठी, तसेच सरकारी कामासाठी पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. अशा ह्या महत्वपूर्ण कागदपत्रात आपल्या डिटेल्स, आपली माहिती अपडेटेड असणे गरजेचे आहे.
आपल्याकडे जवळपास सर्वच स्त्रिया लग्नानंतर आपल्या पतीचे नाव आणि सरनेम लावतात त्यामुळे याची माहिती आपल्याला पॅनकार्ड वर अपडेट करणे गरजेचे आहे नाहीतर आपणास काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लग्नानंतर पॅन कार्डवर आपले नवीन सरनेम अपडेट करणे महत्वाचे आहे. पॅन कार्ड अनेक महत्वाच्या कामात उपयोगी येत असल्याने त्यावरील माहिती हि अपडेटेड असायला हवे. म्हणुनच कृषी जागरण आज आपल्या वाचक मित्रांसाठी पॅन कार्डवर आपले नाव कसे अपडेट करायचे ह्याविषयीं महत्वपूर्ण माहिती घेऊन आले आहे. चला तर मग मित्रांनी जाणुन घेऊया त्याविषयीं.
लग्नानंतर नाव बदल्याणासाठी प्रोसेस
»सर्व्यात आधी ह्या दिलेल्या अधिकृत https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html संकेतस्थळाला भेट द्या.
»होमपेज वर एक फॉर्म दिसेल त्यावर मागितलेली माहिती सर्व व्यवस्थितरीत्या भरा आणि कॅप्टचा कोडं भरून सबमिट करा.
»आता तुम्हाला तुमच्या नावासमोर तयार केलेला सेल निवडावा लागेल आणि फॉर्ममध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर व्यवस्थितपने नमूद करावा लागेल.
»यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये दिलेल्या आपल्या माहितीची पडताळणी अर्थात माहिती व्हॅलिडेट करावी लागेल त्यासाठी व्हॅलिडेट पर्यायावर क्लिक करा.
»हि सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सबमिट ह्या पर्यायावर क्लिक कराव लागेल.
किती लागते फी
हा फॉर्म यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर, आपणास काही शुल्क देखील भरावा लागतो ह्यासाठी आपण ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे किंवा तुमच्या डेबिट, क्रेडिट किंवा कॅश कार्डद्वारे फी जमा करू शकता. जर तुम्ही भारतात वास्तव्यास असाल तर तुम्हाला 110 रुपये शुल्क हि भरावी लागेल आणि जर आपण विदेश मध्ये वास्तव्यास असाल तर आपल्याला 1020 रुपये शुल्क हा द्यावा लागेल.
भरलेला फॉर्म करा डाउनलोड
पॅन कार्ड मध्ये नाव बदलण्यासाठी अथवा इतर दुरुस्ती करण्यासाठी लागणारा शुल्क भरल्यानंतर, तुम्हाला तुम्ही भरलेला फॉर्म डाउनलोड करावा लागेल म्हणजेच प्रिंट काढावी लागेल. त्यानंतर या फॉर्मची हार्ड कॉपी अर्थात प्रिंटआउटवर आपणांस आपले दोन पासपोर्ट साईजचे फोटो चिपकावे लागतील आणि त्यावर तुमची स्वाक्षरी करावी लागेल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आपल्याला आवश्यक कागदपत्रावर स्व-साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेंस्ट करावे लागेल. यानंतर, जर आपण NSDL साठी अर्ज केला असेल तर, भारतीय पोस्टद्वारे NSDL कडे अर्ज पाठवावा लागेल.
Share your comments