मित्रांनो भारतात रेशन कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. गरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करण्यासाठी रेशन कार्डची सरकारने सुरवात केली. शिवाय रेशन कार्ड अनेक सरकारी कामासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. पीएम गरीब अन्न कल्याण योजना हि सरकारने कोरोना काळात मोफत राशन देण्यासाठी सुरु केली होती तेव्हापासून रेशन कार्ड अजूनच जास्त पॉप्युलर झाले. रेशन कार्डचा वापर करून स्वस्त धान्य दुकानावर रेशन कार्ड धारक व्यक्तींना बाजारच्या किमतीपेक्षा कमी किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते.
स्वस्त धान्य दुकानात गहु, तांदूळ, काही ठिकाणी ज्वारी, दाळ इत्यादी स्वस्त दरात गरिबांना उपलब्ध करून दिले जाते. केंद्रातील मोदी सरकारने आता दिवाळीपर्यंत रेग्युलर रेशन व्यतिरिक्त अजून मोफत 5 किलो प्रत्येक व्यक्तीस धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींना ह्याचा फायदा मिळत आहे. असे हे रेशन कार्ड फक्त रेशन घेण्यासाठी कामाला येते असे जर तुम्हाला वाटतं असेल तर तसे नाही आहे. रेशन घेण्याव्यतिरिक्त देखील रेशन कार्डचा वापर केला जातो. त्याविषयीचं आज आपण जाणुन घेणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया आपल्याकडे असलेले रेशन कार्ड कुठेकुठे वापरले जाते.
रेशन कार्ड आपला पत्त्याचा पुरावा म्हणुन काम करते. तसेच अनेक ठिकाणी रेशन कार्ड चा वापर हा आपल्या ओळखीचा पुरावा म्हणुन काम करते शिवाय रेशन कार्ड आपले वित्तीय स्टेटस सुद्धा दाखवते. म्हणजे रेशन कार्ड धारक व्यक्ती गरिबी रेषेखालील आहे की नाही हे रेशन कार्डवरून समजते. रेशन कार्ड खाली दिलेल्या प्रत्येक कामात उपयोगी पाडते.
रेशन कार्ड खालील कामासाठी उपयोगी पडते
»रेशन कार्ड शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागते. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे.
»रेशन कार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी उपयोगी पडते.
»LPG गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी रेशन कार्ड लागते.
»ड्रायविंग लायसन्स मिवण्यासाठी देखील ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
»सरकारी कामात ह्याचा उपयोग होतो जसे की पीएम किसान सन्मान निधी योजनेत, आवास योजनेत, रहिवाशी प्रमाणपत्र मिवण्यासाठी इत्यादी.
»मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो
»नवीन सिम कार्ड घेण्यासाठी
»पासपोर्ट बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो.
»लाईफ इन्शुरन्स मिळविण्यासाठी, तसेच एलआयसी साठी ह्याचा उपयोग होतो
»लँडलाइन कनेक्शन/ब्रँडबँड किंवा वायफाय मिळवण्यासाठी
»आधार कार्ड बनवताना किंवा त्याचे तपशील अपडेट करताना
»पॅन कार्ड बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
Share your comments