छोटे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली सरकारची मुद्रा लोन योजना खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे. छोट्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते. आपला व्यावसाय वाढविण्यासाठी या योजनेची मदत होते. दरम्यान ही योजनेचा लाभ आपण ऑनालाईन पद्धतीनेही घेऊ शकतो.
ई-मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
- अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.
- व्यक्ती भारताचा रहिवाशी असावा, याचा पुरावा.
- अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक.
- बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक असावे आणि आपला मोबाईल नंबरही लिंक असावा.
या बँकांमध्ये मिळेल मुद्रा लोन
- स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India )
- बँक ऑफ बडोदा (Bank of baroda )
- विजया बँक (Vijaya Bank )
- बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra )
- आयसीआयसीआय बँक (ICICI Bank )
- एक्सिस बँक (Axis Bank )
- येस बँक (Yes Bank )
- यूनियन बँख ऑफ इंडिया (Union Bank of India )
- पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
- देना बँक (Dena Bank )
- आंध्र बँक (Andhra Bank )
- आयडीबीआय बँक (IDBI Bank )
- फेडरल बँक (Federal Bank )
Share your comments