
moto g72 smartphone
सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये विविध कंपन्यांनी खूप चांगली वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांसाठी चांगले स्मार्टफोन लॉन्च केले असून ग्राहकांना नक्कीच याचा फायदा मिळेल. कारण प्रत्येकाची इच्छा असते की कमीत कमी किमतीमध्ये चांगला वैशिष्ट्य असलेला फोन मिळावा. अशा व्यक्तींसाठी एक महत्वाची बातमी असून मोटोरोलाने सगळे वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत एक स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असून या स्मार्टफोनचे नाव 'मोटो G72' असे आहे.
नक्की वाचा:सर्वसामान्यांसाठी दिलासादायक! गॅस सिलिंडरची किंमत 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये
मोटो G72 या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची कधीही काढता न येणारी बॅटरी असून जी 33W टाईप सी टर्बो पावर चार्जरने चार्ज केले जाऊ शकते. या फोनमध्ये 6.55 फुल एचडी +POLED डिस्प्ले मध्ये उच्च दर्जाचे व्हिडिओ पाहणे शक्य होणार आहे.
मीडियाटेक हिलीओ G99 प्रोसेसरचा यामध्ये समावेश असून हा सहजतेने काम करतो. यामध्ये गेमिंगसाठी बिलियन कलर दहा बीट 120Hz पोलइडी डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये सहा जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.108अल्ट्रा मेगापिक्सेलचा कॅमेरा,8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, डेप्थ दोन मेगापिक्सल मॅक्रो ट्रिपल रियर कॅमेरा यामध्ये आहे.
यामध्ये शूटिंग डुएल कॅप्चर, टाइमर स्नॅप, लाईव्ह फोटो, पोट्रेट नाईट विजन आणि एचडीआर असे अनेक मोड देण्यात आले आहेत.या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा आहे.
12 ऑक्टोबर पासून घेऊ शकतात फ्लिपकार्टवर
मोटो G72 या मोबाईलची लाँचची माहिती कंपनीने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दिली असून 12 ऑक्टोबर पासून तुम्हाला हा मोबाईल फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार आहे. याबाबतीत कंपनीने म्हटले आहे की बँकेसह काही सवलतीच्या ऑफरच्या माध्यमातून ग्राहक 14999 रुपयांमध्ये हा मोबाईल खरेदी करू शकतील.
तसेच काही सिलेक्टेड बँकेवर तीन हजार रुपयांची एक्सचेंज आणि एक हजार रुपयांची सवलत ऑफर देखील करावी लागेल.
फोनची किंमत
मोटो G72फोनची किंमत 18999 रुपये आहे.
Share your comments