सध्याचा आपण मोबाईल क्षेत्राचा विचार केला तर अनेक प्रकारचे मोबाईल फोनची रेलचेल सध्या बाजारपेठेत आहे. अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्ट फोन सध्या लॉन्च होताना पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहीत आहेच की ज्या पद्धतीने किंमत असते त्या पद्धतीचे वैशिष्ट्य आणि सुविधा संबंधित स्मार्टफोनमध्ये असतात.
परंतु बऱ्याच जणांची इच्छा असते की अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगला फोन मिळावा ही होय. या लेखात आपण अशाच एका मध्यम बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये असणारा फोन विषयी माहिती घेणार आहोत.
मध्यम बजेटमध्ये मिळणारा 'मोटो G52'
काही दिवसांअगोदर मोटोरोला कंपनीने नवीन जी सिरीज असलेला स्मार्टफोन 'MOTO G52' लॉन्च केला आहे. जर या फोनच्या बाबतीत विचार केला तर हा मोटो जी सीरिजमधील सर्वात हलका आणि स्लीम स्मार्टफोन असून याचे वजन अवघे 169 ग्रॅम आहे असा दावा कंपनीचा आहे. या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.
या फोनमध्ये असलेले फिचर
1- हा फोन 6.6 इंचाचा फुल एचडी+AMOLED डिस्प्ले तसेच 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो.
2- कंपनीने या फोनमध्ये 6 जीबी पर्यंत रॅम 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे.
3- तसेच अड्रेनो 610 GPU सह स्नॅपड्रॅगन 680 चीप सेट प्रोसेसर दिलेला आहे.
4- या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी कॉलिटी उत्तम यावी यासाठी एलईडी फ्लॅश तसेच ट्रिपल रियर कॅमेरा सेट दिला असून यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट सेल्फीसाठी सोळा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
नक्की वाचा:आता नो टेन्शन! घरबसल्या आधार कार्डवरील पत्ता बदलायचा आहे? वापरा 'ही'पद्धत,होईल फायदा
5- तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ती 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
6- कनेक्टिविटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंटने सुसज्ज तसेच ब्लूटूथ 5.0, वाय-फाय आणि जीपीएस तसेच एनएफसी सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
या फोनची किंमत
या फोनमध्ये दोन प्रकार असून एक म्हणजे चार जीबी रॅम+128 जीबी इंटरनल आणि दुसरा प्रकार म्हणजे सहा जीबी+128 इंटर्नल जीबी हे होय. यामध्ये ज्या फोनची चार जीबी रॅम आहे त्याची किंमत 14 हजार 499 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 16 हजार 499 रुपये आहे.
Share your comments