विविध आकर्षक परताव्याचा ऑफर आणि व्याजदर आणि गुंतवणुकीची जोखीम नसलेल्या अनेक योजना पोस्ट खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येतात. पोस्टाच्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना असून समाजातील विविध वयोगटातील व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या पोस्टखात्याच्या मार्फत राबविल्या जातात. या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका महत्त्वपूर्ण गुंतवणूक योजना बद्दल माहिती घेणार आहोत.
योजना एक बचत योजना असून यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात फायदा मिळू शकतो.
नक्की वाचा:LIC scheme: 10 लाखांची गुंतवणूक देईल 35 लाख रुपयांचा नफा; अशी करा गुंतवणूक…
काय आहे पोस्टाची ही योजना?
मी पोस्ट खात्याच्या मंथली इनकम स्कीम या योजनेमध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावाने खाते उघडले तर या माध्यमातून मिळणाऱ्या प्रतिमहा व्याजातून तुम्ही मुलाच्या ट्युशन फीस व इतर खर्च भागवू शकतात.
तुम्हाला जर या योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये करायला लागणाऱ्या गुंतवणुकीचाविचार केला तर कमीत कमी एक हजार रुपये आणि कमाल साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला यामध्ये करता येते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 6.6 टक्के दराने व्याज दिले जाते.
या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलासाठीखाते उघडायचे असेल तर त्याचे वयाचे दहा वर्ष पूर्ण झालेले असावे व त्याचे वय दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याऐवजी त्याचे पालक हे खाते उघडू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्ष असून त्याच्या नंतर ते खाते बंद करता येऊ शकतो.
कसा मिळतो लाभ?
समजा तुमचे मूल दहा वर्षाच्या असेल व त्याच्या नावावर तुम्हाला जर दोन लाख रुपये जमा करायचे असेल तर त्याचे व्याज 6.6 टक्के व्याजदराने प्रतिमहा अकराशे रुपये होईल. पाच वर्षांमध्ये व्याजाचे एकूण 66 हजार रुपये जमा होतात व तुम्हाला शेवटी दोन लाखाचा परतावा देखील मिळेल.
पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलासाठी अकराशे रुपये प्रतिमाह मिळू शकतात व त्याचा फायदा त्याच्या शिक्षणासाठी करू शकतात. या मिळणाऱ्या याच पैशातून तुम्ही शाळेची फी, ट्युशन फी व इतर छोट्यामोठ्या शिक्षणाचा खर्च सहज काढू शकतात. जर तुम्ही या योजनेत साडेचार लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 2 हजार 475 रुपयांचा लाभ मिळू शकतो.
Share your comments