पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता मोदी आज जाहीर करणार
केंद्र सरकारचे महत्वकांशी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात हे सहा हजार रुपये दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध विभागून दिले जातात त्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता जाहीर करणा आहेत. पंतप्रधान मोदी हे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्याचे संवाद साधतील अशा प्रकारची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
या योजनेअंतर्गत आज 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांसह केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील सहभागी होणार आहेत. पी एम किसान सन्मान योजना ही 2019 मध्ये अंतरिम बजेट मध्ये जाहीर करण्यात आली असून डिसेंबर 2018 पासून अमलात आली होती.
हेही वाचा : जाणून घ्या पीएम किसान योजनेचा पैसा तुम्हाला मिळणार की नाही?
यादी मध्ये आपले नाव कसे चेक करावे
जर आपण या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर पंतप्रधान किसान पोर्टल वर म्हणजेच pmkisaan.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आपले नाव तपासू शकता. ते कसे तपासावे हे पाहू.
-
सर्वप्रथम पंतप्रधान किसान च्या अधिकृत वेबसाईट ला https://pmkisaan.gov.in भेट द्या.
-
वेबसाईट उघडल्यानंतर मेनू बार मधील फार्मर कॉर्नर वर क्लिक करा.
-
यानंतर आपले राज्य, जिल्हा, गट आणि गावाची माहिती प्रविष्ट करा
-
यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.
-
या यादीमध्ये आपले नाव तपासू शकता.
यादीमध्ये नाव नसल्यास तक्रार कोठे नोंदवावी.
जर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादी मध्ये नसेल तर आपण पी एम किसान या वेबसाईटवर हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदवू शकता.
-
पी एम किसान हेल्पलाइन -155261
-
पंतप्रधान किसान टोल फ्री-1800115526
-
पंतप्रधान किसान लँड लाईन क्रमांक-011-23381092,23382401
-
ई-मेल आयडी [email protected] वर ईमेल द्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते
Share your comments