1. इतर बातम्या

मोदी सरकार कामगिरी दमदार! आता केली ही मोठी घोषणा

मोदी सरकारकडून देशातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहेत. त्यामधून अनेक शेतकरी आणि नागरिकांना फायदा होत आहे. मोदी सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्यामध्ये आता पैसे गुंतवून वृद्धपकाळात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. अशीच एक योजना आता असंघटित कामगारांसाठी सरकारने आणली आहे.

Shram Yogi Mandhan Yojana

Shram Yogi Mandhan Yojana

मोदी सरकारकडून (Modi Goverment) देशातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना (scheme) राबवत आहेत. त्यामधून अनेक शेतकरी आणि नागरिकांना फायदा होत आहे. मोदी सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्यामध्ये आता पैसे गुंतवून (investment) वृद्धपकाळात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. अशीच एक योजना आता असंघटित कामगारांसाठी (unorganized workers) सरकारने आणली आहे.

जर तुम्ही निवृत्तीकडे वाटचाल करत असाल, वृद्धापकाळात तुम्हाला पैशाची चिंता वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण केंद्रातील मोदी सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय चांगली योजना आणली आहे. या योजनेमध्ये सामील झाल्यानंतर, पैशाबद्दलची तुमची चिंता पूर्णपणे संपेल.

होय, तुम्हाला केंद्र सरकारच्या श्रम योगी मानधन योजनेबद्दल (Shram Yogi Mandhan Yojana) सांगत आहोत. ज्यामध्ये नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. तुम्हीही मानधन योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही विलंब न करता त्यात नोंदणी करू शकता.

आता वाहणार दुधाची नदी! दूधउत्पादकांनो गाई-म्हशींना द्या हा हिरवा चारा, होईल भरघोस दुधवाढ

हे लोक पात्र असतील

या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा पेन्शनची (Pension per month) सुविधा दिली जाते. ही योजना 25 ते 36 वयोगटातील कामगारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आतापर्यंत या योजनेबद्दल बोललो तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.

यामध्ये सामील होण्यासाठी, तुम्ही नाममात्र रक्कम जमा करून दरमहा 3,000 रुपये किंवा 60 वर्षांच्या वयानंतर वार्षिक 36,000 रुपये पेन्शन घेऊ शकता. या योजनेत सामील होण्यासाठी सर्वात महत्त्वाची वयोमर्यादा ही 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावी.

शेतकऱ्यांनो वेळीच व्हा सावध! पिकांवर घोगावतोय ग्रास हॉपरचा धोका, त्वरित करा हे उपाय

योजनेत सामील होणाऱ्या कामगारांच्या वयानुसार योगदान घेतले जाते. जर 18 वर्षांची व्यक्ती या योजनेत सामील झाली तर त्याला 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीचे वय 29 वर्षे असेल तर त्याला पेन्शन मिळण्यासाठी वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा 100 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास, 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 200 रुपये जमा करावे लागतील.

महत्वाच्या बातम्या:
पिके येतील जोमदार! शेतात टाका गांडूळ खत आणि उत्पन्नात करा दुप्पट वाढ; जाणून घ्या कधी आणि कसे वापरायचे?
एकच नंबर! शेतकऱ्यांनो गाई-म्हशींना टक्कर देत आहेत या शेळ्यांच्या जाती; जाणून घ्या...

English Summary: Modi government Now made this big announcement Published on: 26 July 2022, 02:38 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters