Sharad Pawar: शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यभरातील कार्यकर्ते नेते तीव्र विरोध करत आहेत. अनेकांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतोद अनिल पाटील हे राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिलेले आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक महत्त्वाचा राजीनामा अनिल पाटील यांचा असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होत असल्याची घोषणा शरद पवारांनी करताच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ आलेली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे. तर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी सुद्धा आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पवारांना पाठवले. राष्ट्रवादी पक्षातून हा एक मोठा राजीनामा असल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवार यांना दिलं. काही वेळापूर्वी अनिल पाटील हे सिल्वर ओकवर आले होते आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळेस आपण शरद पवार यांनी घेतलेली भूमिका मागे घ्यावी, अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊन असे पत्र दिले आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार? 'ही' चार नावे आघाडीवर
राज्यामध्ये राष्ट्रवादीचे वेगवेगळे पदाधिकारी हे राजीनामा देत आहेत. राज्यात अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तसेच प्रतोद म्हणूनही काम पाहतात. पाटील यांनी आज सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेत राजीनामा पत्र दिले आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा हा विधान सभा अध्यक्षांना द्यावा लागतो, मात्र अनिल पाटील यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिले आहे.
यावेळी अनिल पाटील म्हणाले की, 'आमचे जे काही राजकीय अस्तित्व आहे, शरद पवार यांच्यामुळे आहे, त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, त्यामुळे मी हे राजीनाम्याचे पत्र शरद पवार यांना दिले आहे. तसेच शरद पवार यांनी ठोस निर्णय घेतल्यानंतर आम्ही आपली भूमिका स्पष्ट करू.
Share your comments