गेल्या अनेक महिन्यापासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे. या संपामुळे एसटीचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बरेच मागणी असून सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे हे एसटीच्या विलीनीकरण याबाबत आहे. यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली असून येत्या दोन दिवसांमध्ये या समितीचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे.हा अहवाल आल्यानंतरच एसटीच्या विलीनीकरण याबाबत पुढचे पाऊल उचलता येईल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी केले. ते मालेगावी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेणे विषयी वारंवार आव्हान करण्यात येत आहे परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने निर्णय होऊ शकलेला नाही.. आता त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यानंतर तो न्यायालयाला सादर केला जाईल. पुढे ते म्हणाले की एसटीचा संप हा लांबवत ठेवण्यात आल्यामुळे आणि एसटी कर्मचाऱ्यांना फीतवणाऱ्या मुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर त्रिसदस्य समिती जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू.
सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी बोलताना ते म्हणाले की किरीट सोमय्या यांनी कुठलेही आरोप करण्यापूर्वी माहितीची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधी जरूर आवाज उठवावा, मात्र सगळ्यांचेच भ्रष्टाचार बाहेर काढले पाहिजेत.. उगाच राजकीय नौटंकी करू नये असा आरोप करीत सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला नसल्याचा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला.
Share your comments