केंद्र सरकारने मेरा राशन ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप रेशन कार्डधारकांना फार मोठ्या प्रमाणात मदत करते.हे ॲप कन्सुमर अफेअरर्समंत्रालयाने लॉंच केले आहे.या मंत्रालयामार्फत धान्य वितरण प्रणाली वर काम करते. रेशन दुकानाच्या चक्कर मारणे यामुळे आता वाचणार आहे. या लेखात आपण या ॲप विषयी माहिती घेऊ.
काय आहे स्वरूप मेरा राशन ॲपचे?
केंद्र सरकारने वन नेशन वन राशन कार्ड सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कन्सुमर अफेअरस मंत्रालयाने हे अँपलॉन्च केले आहे. बरेच लोक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात.त्यामुळे सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेला सुरूवात केली आहे.मेरा राशन ॲपच्या मदतीने रेशन कार्डची माहिती नोंद केल्यानंतर ती माहिती तुम्ही डाऊनलोडही करु शकता. याद्वारे तुम्ही रेशन कार्ड सोबत तुमच्या आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पाहू शकता. तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य वितरण झाले आहे आणि तुमच्या घराजवळ किती रेशन डीलर्स आहेत याचीही माहिती तुम्हाला मिळते.ही सगळी सिस्टिम गुगल मॅप्स नी जोडली गेली आहे.
ॲप आधी गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करावे.तुमच्या मोबाईल मध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय दिला जातो.जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केले असेल तर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून रेशनचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही राशन कार्ड चा नंबर टाकणे गरजेचे आहे. तसेच नंबर टाकल्यानंतर रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती दिसते तसे तुमचा आधार क्रमांक ही तिथे दिसेल.
या ॲपच्या मदतीने आधार कार्ड लिंक करणे झाले सोपे…
तुम्हाला तुमच्या राशन कार्ड वन नेशन वन राशन कार्ड या योजनेअंतर्गत आहे की नाही याची माहिती घेता येऊ शकते. मोबाईल ॲप मध्ये एलिजिबिलिटी चा पर्याय दिला जातो. पण आधार कार्डचा क्रमांक जोडला नसला तरीही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तो लिंक करता येतो. त्या पद्धतीने तुम्ही नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समजेल की या योजनेअंतर्गत तुमच्या राशन येते की नाही. जर तुमचा आधार क्रमांक रेशन कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्ही तो अगदी सहजपणे लिंक करू शकता.
Share your comments