सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे पेव फुटले आहे. इलेक्ट्रिक कार सोबतच सीएनजी वाहनांच्या मागणी मध्ये देखिल दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचा कल बघता अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या आता सीएनजी कारवर लक्ष केंद्रित केले आहे. जर आपण सीएनजी बद्दल विचार केला तर ह्युंदाई आणि मारुती सुझुकी सोबत टाटा मोटर्सने देखील या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे.मारुती सुझुकी चे या क्षेत्रांमध्ये आधीच वर्चस्व आहे.
या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी आपल्या डिझायर कार चे सीएनजी व्हेरीयन्टलॉन्च करणार आहे. रिपोर्टनुसार मारुती सुझुकीच्या काहीडीलर्स कडेआगमन होणाऱ्या सीएनजी कार ची बुकिंग सुरू झाली आहे. अगोदर मारुतीने जानेवारी महिन्यात सेलेरियो कारचा सीएनजी व्हर्जन लॉन्च केला होता. जर मारुती-सुझुकीच्याच सध्याचा विक्रीचा विचार केला तर ही कंपनी डिझायर च्या 10000 पेक्षा जास्त युनिटची महिन्याला विक्री करते.
जर फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर डिजायर कारच्या विक्रीत सेट 46 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून जवळजवळ साडे सतरा हजार युनिटची विक्री करण्यात आली आहे.मारुती सुझुकी लवकरच डिझायर कारचा सीएनजी व्हेरीयन्टलॉन्च करणार आहे.
Share your comments