1. इतर बातम्या

वॅगनार 2022 भारतात लॉन्च, लवकरच सीएनजी रूपामध्ये देखील दर्शन देणार, वाचा सविस्तर माहिती

सध्या वेगवेगळ्या कंपनीच्या कार्स बाजारामध्ये लॉन्च करण्यात येत आहे.त्यामध्येच पेट्रोल व डिझेलचे दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत असताना अनेक इलेक्ट्रिक वाहनांचे पेव बाजारात फूटले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
maruti suzuki wagnor 2022 launch

maruti suzuki wagnor 2022 launch

सध्या वेगवेगळ्या कंपनीच्या कार्स बाजारामध्ये लॉन्च करण्यात येत आहे.त्यामध्येच पेट्रोल व डिझेलचे दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत असताना अनेक इलेक्ट्रिक वाहनांचे पेव बाजारात फूटले आहे.

इतकेच नाही तर इलेक्ट्रिक वाहनांचा सोबत सीएनजी वाहन देखील बऱ्याच कंपन्या लॉन्च करत आहेत.वाहन उद्योग क्षेत्रातील मारुती सुझुकीने बर्‍याच दिवसांच्या कालावधीनंतर वॅगनार 2022 भारतात लॉंच केली आहे. या लॉन्च केलेल्या फेसलिफ्ट मॉडेलची एक्स शोरूम किंमत पाच लाख 39 हजार रुपयांपासून सुरू होतेतर टॉप मॉडेल ची किंमत सात लाख दहा हजार रुपये आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कार प्रेमींसाठी मारुती सुझुकी खुशखबर देत असूनवॅगनार या मॉडेलचे सीएनजी व्हेरीयंट देखील कंपनीने लॉंच केले असून त्याची एक्स शोरूम किंमत सहा लाख 81 हजार रुपये आहे.

या कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार तुम्ही भाड्याने देखील घेऊ  शकतात.ग्राहक ही कार बारा हजार रुपये प्रति महिन्याच्या भाड्याने घरी आणू शकता. कंपनी आता लवकरच या स्वस्त हॅचबॅकचे सीएनजी वेरिएंटबाजारात आणणार आहे.

 या कारचे वैशिष्ट्ये

हीकारअनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन सहा इंचाचा स्मार्ट प्ले स्टुडियो इनफॉटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.याला चार स्पीकर्स आहेत शिवाय या कारमध्ये ड्युअल एअर बॅग,अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम,इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन,फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि रियर पार्किंग सेन्सर्स सोबत अनेकसुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

या कारच्या मायलेज बाबत कंपनीने दावा केला आहे की, हे कार पेट्रोल वर्जन मध्ये 25.19किमी प्रति लिटर एवढे मायलेज देईल.जुन्या मॉडेल च्या तुलनेत सुमारे 16 टक्के अधिक आहे.तर एस- सीएनजी मध्ये हे मायलेज 34.05किमी प्रति लिटर असेल.

English Summary: maruti suzuki launch cng verient wagnor car that car is first prefrence to farmer Published on: 12 March 2022, 07:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters