
image courtesy-motorbash
देशात अनेक लोकांचे स्वतःची एक फोरविलर असावे असे स्वप्न असते मात्र फोर व्हीलर विकत घेण्यासाठी एवढी मोठी रक्कम अवेलेबल नसल्याने अनेक लोकांचे हे स्वप्न पुर्णत्वास येत नाही. मात्र आज आम्ही अशा लोकांसाठी एक भन्नाट ऑफर विषयी माहिती घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही केवळ एक लाख रुपयात मारुती सुझुकीची अल्टो ही सीएनजी वैरिएन्ट मधली गाडी आपल्या घरी घेऊन जाऊ शकता.
देशात सर्वात जास्त मारुती सुझुकीच्या गाड्या विक्री होत असतात, मारुती सुझुकी ही देशातील नामी कंपन्यांपैकी एक आहे, या कंपनीची वॅग्नर आणि अल्टो 800 या दोन गाड्या मध्यमवर्गीयांची पहिली पसंत म्हणून अलीकडे खूपच प्रचलित झाल्या आहेत. या दोन्ही गाड्या कंपनीच्या टॉप सेलिंग गांडींच्या यादीत शीर्षस्थानी विराजमान आहेत. मारुती सुझुकीच्या या दोन्ही गाड्या कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी या गाड्या विशेष लाभदायी सिद्ध होत आहेत. अल्टो गाडी सीएनजी मध्ये देखील अवेलेबल आहे. सर्व्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मारुती अल्टो सीएनजी मायलेजसाठी विशेष ओळखली जाते. ही गाडी 31 किलोमीटर प्रति किलोग्रॅमचे मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे.
मित्रांनो जर आपणासही मारुती अल्टो खरेदी करायची असेल मात्र पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल तर चिंता करू नका आज आम्ही आपल्यासाठी विशेष एक ऑफर घेऊन आलो आहोत या ऑफरचा लाभ घेऊन आपण मात्र एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरून मारुती अल्टो घरी घेऊन जाऊ शकता. मारुती सुझुकीची अल्टो सीएनजी व्हेरीयंट 4.89 लाख एक्स शोरूम प्राईस मध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या गाडीची फाईव्ह सीटर कपॅसिटी आहे. या गाडीला मॅन्युअल ट्रान्समिशन कंपनीने लावून दिलेले आहे. 4.89 लाख रुपये एक्स शोरूम किंमत असलेल्या या अल्टो गाडीला एक लाख रुपये डाऊन पेमेंट उर्वरित रक्कमसाठी लोन पास केले जाऊ शकते.
एका कंपनीच्या ईएमआय कॅल्क्युलेटर नुसार, जर आपण ही गाडी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरले तर आपणास 9299 रुपयाचा मासिक हप्ता पाच वर्षापर्यंत भरावा लागेल. कंपनी कार लोन साठी 9.29 टक्के व्याज दर आकारत असते. यानुसार आपणास पाच वर्षात सुमारे 1 लाख 18 हजार 254 रुपये व्याज भरावे लागणार आहे.
Share your comments