1. इतर बातम्या

झकास! जुन्या स्प्लेंडरला बनवा इलेक्ट्रिक; तीन वर्षेपर्यंत कुठलाच मेंटेनन्स खर्च नाही आणि फक्त 17 रुपयात धावणार 151 किलोमीटर

देशात सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची खपत वाढली आहे असे असले तरी अजूनही देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांनी स्कूटर वगळता इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती केलेली दिसत नाही. परंतु आता एका कंपनीने देशात सर्वात जास्त विक्री होणारी बाईक अर्थात स्प्लेंडर गाडीसाठी एक विशेष कन्वर्जन कीट तयार केले आहे या किटचा वापर करून स्प्लेंडर गाडी पूर्णता इलेक्ट्रिक करता येते. या किटची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामुळे तयार होणारी इलेक्ट्रिक स्प्लेंडर केवळ 17 रुपयांच्या खर्चात जवळपास 151 किलोमीटर धावते. अर्थात ही इलेक्ट्रिक स्प्लेंडर गाडी चार्ज होण्यासाठी 17 रुपयाची इलेक्ट्रिसिटी वापरले जाते आणि एकदा चार्ज केल्यानंतर हे गाडी तब्बल 151 किलोमीटर पर्यंत धावू शकते. मित्रांनो जर आपणास ही आपली स्प्लेंडर इलेक्ट्रिक बनवायचे असेल तर आपणही कन्वर्जन किट ऑनलाइन खरेदी करू शकता, किंवा या कंपनीच्या डीलरशी संपर्क साधून आपण ती खरेदी करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
splendor

मित्रांनो या कन्वर्जन किटची निर्मिती गोगो ए1 GoGoA1 या कंपनीने केली आहे. या कंपनीने स्प्लेंडर गाडी साठी आपले कन्वर्जन किट ऑल रेडी बाजारात उतरवले आहे तसेच या कंपनीने आगामी काही दिवसात हिरोच्या एचएफ डीलक्स या गाडीसाठी कन्वर्जन किट तयार करण्याचे देखील उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. या किटची दुसरी सर्वात मोठी विशेषता म्हणजे या किटला आरटीओचे परमिशन प्राप्त आहे, आरटीओकडून आपणास या गाडीसाठी ग्रीन नंबर प्लेट जारी केली जाणार आहे. स्प्लेंडर मोटारसायकल जर आपणास इलेक्ट्रिक करायची असेल तर आपणांस या गाडीसाठी आवश्यक इलेक्ट्रिक किट 35,000 रुपये किमतीत दिले जाते असे असले तरी मात्र स्प्लेंडर गाडी इलेक्ट्रिक करण्यासाठी या किट व्यतिरिक्त 50,000 रुपयांची बॅटरी आणि 6,000 रुपये जीएसटी म्हणून अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. जुनी स्प्लेंडर प्लस इलेक्ट्रिक करण्यासाठी आपणांस सुमारे 90 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कंपनी स्प्लेंडर इलेक्ट्रिक किट आणि मोटरवर 3 वर्षांची वॉरंटी देते. बॅटरीवर देखील तीन वर्षांची वॉरंटी कंपनी द्वारे देण्यात आली आहे. मोटरसायकलमध्ये इलेक्ट्रिक किट बसवल्यानंतर आरटीओकडून नवीन ग्रीन नंबर प्लेट मिळते. 

GoGoA1 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या बिलाद्वारे बाइकचे आरसीमध्ये रूपांतर करून RTO द्वारे ग्रीन प्लेट जारी केली जाते. ही स्प्लेंडर इलेक्ट्रिक किट बनवणारी कंपनी दावा करते की, एका चार्जमध्ये ही बाईक 120 ते 151 किमी पर्यंत धावण्यास सक्षम आहे. मित्रांनो भारतीय बाजारात लॉन्च होणाऱ्या बाईक आणि स्कूटरपेक्षा ही किट स्वस्त नाही, परंतु ही किट रेंज आणि स्पीडसाठी इतर इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक पेक्षा खूप अधिक चांगली आहे. विशेष म्हणजे जुनी स्प्लेंडर इलेक्ट्रिक किट बसवून इलेक्ट्रिक केली असल्यास अपघात विमा देखील लागू होतो. इलेक्ट्रिक किटमधील मोटरची क्षमता 2 किलोवॅट एवढी आहे.  बाईकमधून पेट्रोल इंजिन काढले जाते आणि बॅटरी सोबत किटला फिट केले जाते. तसेच, एक MCB आणि काही कन्व्हर्टर आहेत जे बाईकच्या साइड बॉडी पॅनल्सवर बसवले जातात. ही बाईक कस्टमाईज करण्यासाठी बजाज पल्सरमधून मागील ब्रेक घ्यावे लागतील. इलेक्ट्रिक किट बसवल्यानंतर स्विचगियर पूर्वीप्रमाणेच राहतील.

हिरो स्प्लेंडरमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्यास आरटीओने मान्यता दिली आहे. इलेक्ट्रिक स्प्लेंडर बनवण्यासाठी बसवलेली मोटर 63 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. तथापि, ही मोटर जास्तीत जास्त 127 Nm टॉर्क पर्यंत पोहोचू शकते. ही इलेक्ट्रिक स्प्लेंडर 100 किलो ते 300 किलोपर्यंतचा भार वाहून नेऊ शकते. बाईकवर दोन लोक बसवुन 70 किमी प्रतितास वेगाने धावले जाऊ शकते. या गाडीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही इलेक्ट्रिक स्प्लेंडर फक्त 17 रुपयात 151 किलोमीटर धावण्यास सक्षम आहे अर्थात 10 पैशात एक किलोमीटर धावण्यास ही इलेक्ट्रिक स्प्लेंडर सक्षम आहे.

English Summary: make old splendor electric and run upto 151 km Published on: 02 March 2022, 10:41 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters