आज गणपती बाप्पाचे घरोघरी मोठ्या दिमाखात आगमन झाले. घरोघरी तर बाप्पांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तीभावाने केली गेली परंतु राज्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील तेवढाच भक्तिभावाने गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. आपल्याला माहित आहेच की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक संदेश यावर आधारित व इतर प्रकारे उत्कृष्ट देखावे तयार करतात.
रोषणाई, दिव्यांची झगमगाट इत्यादी मुळे वातावरण एकदम प्रफुल्लित होऊन जाते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी राज्य सरकारकडून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्य शासनाने उत्कृष्ट देखाव्याच्या बाबतीत स्पर्धेचे आयोजन केले असून 2 सप्टेंबर पर्यंत मंडळांना यासाठी अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
नक्की वाचा:'मातोश्री च्या दारात सुखशांती दाबून दे, हीच गणरायाकडे प्रार्थना'
या स्पर्धेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यस्तरावरील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यांना रुपये पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दुसऱ्या क्रमांकाचे 2 लाख 50 हजार तर तिसरा क्रमांकासाठी एक लाख रुपये इतक्या रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळात 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अर्ज व निवड पद्धत
यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या वेबसाईटवर 'व्हॉट इज न्यू' या शीर्षकावर निशुल्क अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हा स्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.
नक्की वाचा:ए आई, देव बाप्पा आले! घरोघरी गणरायाचे थाटात आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या अटी
1- यामध्ये सहभागी होण्यासाठी गणेशोत्सव मंडळातील जी काही मूर्ती आहे ती पर्यावरण पूरक असावी.
2- सजावटीमध्ये देखील थर्माकोलच्या प्लास्टिकचा वापर नसावा व संबंधित मंडळाचे जे काही वातावरण आहे ते ध्वनीप्रदूषण मुक्त असावे.
3- विविध प्रकारच्या समाज प्रबोधन विषयावर देखावा किंवा सजावट असावी. उदा. अंधश्रद्धा निर्मूलन, पाणी वाचवा इत्यादी
4- जर तुम्ही मंडळांमध्ये स्वातंत्र्य चळवळ व या संदर्भातील देखावा किंवा सजावट केली असेल तर त्याला अधिक गुण मिळतील.
5- या स्पर्धेत वैद्यकीय सेवा शिबिरे, रक्तदान शिबिर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे देखील यामध्ये मूल्यमापन होईल.
6- तसेच महिला महिला व ग्रामीण भागातील जे काही वंचित घटक आहे त्यांचे शैक्षणिक व आरोग्य इत्यादी बाबत संबंधित मंडळाचे कार्य असावे.
7- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधामध्ये प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार तसेच स्वच्छता व वाहतुकीस कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही असे नियोजन, त्यातील शिस्त या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या जाणार असल्याची माहिती देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
नक्की वाचा:गणेशोत्सवानिमित्त फुलबाजार फुलला, फुलांच्या किमतीमध्ये वाढ
Share your comments