महाराष्ट्र शासनाने कृषीदिन हा 1 जूलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचा जीवनप्रवास:
1 जुलै 1913 |
यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म. |
1933 |
नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. |
1937 |
मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्तीर्ण. |
1940 |
नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्तीर्ण. |
1941 |
प्रारंभी अमरावतीचे प्रख्यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख ह्यांच्या बरोबर व नंतर पुसद येथे स्वतंत्रपणे वकिली व्यवसायास प्रारंभ. |
|
पुसद तालुक्यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार. |
|
त्यांच्या प्रयत्नांमुळे व तळमळीमुळे त्यांचे स्वत:चे गाव ‘गहुली’ हे आदर्श गाव बनले. |
6 जुलै 1941 |
प्रतिष्ठित ब्राम्हण घराण्यातील कु. वत्सला घाटे यांच्याशी विवाह केला. हा विवाह आंतरजातीय असल्यामुळे त्यांच्या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्यांना वाळीत देखील टाकण्यात आले. |
1946 |
पुसद नगरपालिकेच अध्यक्ष म्हणून निवड. जुन्या मध्यप्रदेश राज्यात उपमंत्री म्हणून 1952 मध्ये नियुक्ती होईपर्यत याच पदावर होते. ह्या अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली. |
1950 |
पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्ष. |
1951 |
विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्य. |
1952 |
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती. |
|
ह्याच काळात मध्यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. |
|
मध्यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्यक्ष व मध्यप्रदेश सरकारच्या मेट्रिक समितीचे अध्यक्ष होते. |
1956 |
राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मुंबई राज्यात सहकार, कृषी, दुगधव्यवसाय या खात्यांचे मंत्री म्हणून नियुक्ती. |
|
अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे तेव्हापासून सदस्य. |
1957 |
सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवड झाली. महाराष्ट्र मंत्रिमंडळात कृषीमंत्री म्हणून नियुक्ती. |
|
इंडिया कौन्सिल ऑफ एग्रिकल्चरल फायनान्स सोसायटीचे सभासद म्हणून निवड. |
1958 |
जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश व जपानला भेट, टोकीयो येथे एफ.ए.ओ.च्या बैठकांना हजर. |
1959 |
पुसद येथे ‘फुलसिंग नाईक कॉलेज’ ची स्थापना. चिनी सरकारच्या शेतकी संघटनेच्या निमंत्रणावरुन चीनला भेट. |
1960 |
महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून नियुक्ती. ह्या वेळी शासनाने महत्वपूर्ण असा कमाल जमीनधारणा क्षेत्रासंबंधीचा कायदा संमत केला. |
|
आपल्या मंत्रीपदाच्या कारकीर्दित त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले व महाराष्ट्रात पंचायती राज्याची मुहूर्तमेढ रोवली. |
1962 |
सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्हातील पुसद मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवड होऊन पुन्हा महसूल मंत्री म्हणून नियुक्ती आणि मुख्यमंत्री होईपर्यत हेच खाते त्यांच्याकडे राहिले. |
5 डिसेंबर 1963 |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. |
1964 |
युगोस्लाव्हियाचा दौरा. |
1965 |
1 मे 1965 रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन एकॅडमी ऑफ लेटर्स) संस्थेचे उद्घाटन. |
|
भारत-पाक संघर्ष सुरु होताच 9 ते 11 सप्टेंबरला मुंबईत स्फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्यामुळे महाराष्ट्रात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्द सज्जतेसाठी महाराष्ट्राचा दौरा केला. |
|
शेती उत्पादनाच्या नव्या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हांचा दौरा. |
1966 |
अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेलया शेतकऱ्यांना हिंमत देण्यासाठी राज्यातील दुष्काळी जिल्हयांत झंझावती दौरा. |
1967 |
सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभावी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होऊन 6 मार्च 1967 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुसऱ्यांदा एकमताने निवड. |
|
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र विधानसभेत भाषण (17-11-1967) |
1970 |
अमेरिकी शासनाच्या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपिय देशांना भेटी. |
1972 |
सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्यांदा निवड होऊन 14 मार्च 1972 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली. |
|
महाराष्ट्रात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ पडला होता. राज्यातील नऊ जिल्हांतील दुष्काळ हा देशातील इतर कोणत्याही भागातील दुष्काळापेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा होता; प्रत्येक जिल्हयात फिरुन त्यांनी दुष्काळी कामाला जोराने चालना दिली. |
20 फेब्रु 1975 |
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. |
12 मार्च 1977 |
वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड. |
18 ऑगस्ट 1979 |
सिंगापुर येथे 66 व्या वर्षी निधन. |
संदर्भ:
महानायक ग्रंथ- संपादन : मधुकर भावे
सामान्यांतील असामान्य- वसंतराव नाईक : लेखक. पंढरीनाथ पाटील
Share your comments