LPG Cylinder Price: आज 2022 च्या शेवटच्या महिन्याची सुरुवात आहे. 2022 चा शेवटचा महिना सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. सर्वात मोठा दिलासा म्हणजे तेल कंपन्यांनी घरगुती सिलिंडरसह व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमतही स्थिर ठेवली आहे.
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचवेळी, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 115.50 रुपयांनी कमी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे, सलग सहा वेळा व्यावसायिक सिलिंडर स्वस्त मिळत होता, मात्र यावेळी या 19 किलोच्या निळ्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
याआधी, 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल 6 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती एलपीजीच्या किमती 15 रुपयांनी वाढल्या होत्या. तर यापूर्वी 22 मार्च 2022 रोजी किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या.
मोठी बातमी! आजपासून या पाच नियमांमध्ये होणार मोठा बदल, लगेच जाणून घ्या, नाहीतर…
आज घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये दराने उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 1744.00 रुपये, कोलकातामध्ये 1845.50 रुपये, मुंबईमध्ये 1696.00 रुपये आणि चेन्नईमध्ये 1891.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.
Today Horoscope : या राशीच्या अविवाहित लोकांसाठी नातेसंबंध येऊ शकतात; वाचा तुमचे राशिभविष्य
देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल, भोजनालय इत्यादींमध्ये वापरला जातो.
त्यामुळे त्यांना किमतीतील कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. हा सलग सहावा महिना आहे जेव्हा व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.
मोठी बातमी! आजपासून या पाच नियमांमध्ये होणार मोठा बदल, लगेच जाणून घ्या, नाहीतर…
Share your comments