श्रीमंती म्हटलेकी तो साज, तो रुबाब आणि तो मोठेपणा हा असतोच. करोडपती म्हटलेकी मोठे राजवाडे, हवेली, आलिशान राहणीमान या गोष्टी आपल्या समोर येतात. करोडपती लोकांविषयी आता काही अशी माहिती सांगणार आहोत ते एकूण तुम्हांला नवलच वाटणार आहे. जेथे करोडपती सुद्धा कच्च्या मातीच्या घरात राहतात. हो सत्य आहे.
या गावचे अनेक वैशिट्य आहेत. या गावातील घरांना कुलूप लावली जात नाहीत. गावात गेल्या ५० वर्षात एकदाही चोरी झाली नाही. गावातील पोलीस ठाणे एकदम निवांत असते. आज पर्यंत पोलीस ठाण्यात एकही गुन्हा नोंदवला गेला नाही. हे गाव राजस्थान राज्यात आहे. या गावाचे नाव देवमाली असे आहे. हे गाव राजस्थान राज्यातील अजमेर या प्रसिद्ध स्थळापासून जवळ आहे.
गावचे वैशिट्य
या गावातील घरांना कुलूप लावली जात नाहीत.
दारात अलिशान महागड्या कार्स आहेत पण कुणाच्याही घराला पक्के छत नाही.
गावातील लोक पूर्ण शाकाहारी आहेत.
दारू, सिगरेटचे सेवन केले जात नाही.
दररोज सकाळी गावातील प्रत्येक गावकरी पहाडावर असलेल्या भगवान देवनारायणाच्या दर्शनाला अनवाणी जातात.
भगवान देवनाराय या देवावर गावाचा गाढ विश्वास आहे.
गावात श्रीमंत गावकरी आहेत पण कुणाच्याच नावावर गावातली जमीन नाही. गावाची संपूर्ण जमीन या देवाच्या नावावर आहे.
३००० लोकसंख्येचे गाव
देवमाली गावात ३०० कुटुंबे असून गावाची वस्ती ३००० आहे. २५ वर्षे सरपंच असलेल्या भागीबाई सांगतात, गावात एकाच गोत्राचे सर्व लोक आहेत. वीज गेली तर तेलाचे दिवे लावले जातात. रॉकेलचा वापर केला जात नाही. आम्ही दगड आणि मातीची घरे बांधून त्यात राहतो. सिमेंट, चुना याचा वापर सुद्धा केला जात नाही. गावात फक्त देवनारायण मंदिर, शाळेची इमारत पक्की बांधली गेली आहे. दर भाद्रपदात येथे मोठी यात्रा भरते. सगळी जमीन देवाची असल्याने ग्रामस्थ पशुपालन करून उदरनिर्वाह चालवतात आणि काही व्यवसाय करतात.
गावची ऐतिहासिक कथा
कथा सांगतात की, गावकऱ्यांची श्रद्धा बघून प्रसन्न झालेले भगवान देव नारायण प्रत्यक्ष गावात आले आणि त्यांनी गावकऱ्याना वरदान मागायला सांगितले. पण गावकऱ्यांनी काहीही मागितले नाही. तेव्हा जाताना देवाने त्यांना आनंदाने राहा, सुखात राहा असा आशीर्वाद दिलाच पण गावात पक्के घर बांधू नका असेही सांगितले जाते. त्यामुळे गावात आजही एकही घर पक्के नाही. जर कुणी तसा प्रयत्न केलाच तर संकट येते असे म्हणतात.
Share your comments